- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
पुणे: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी ते मृतावस्थेत सापडले. काही महिन्यांपासून येथे भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. दोन ते तीन दिवसांआधी त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता फ्लॅटमध्ये महाजनी मृतावस्थेत आढळले. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे रुग्णालयात पाठवण्यात आला.
रवींद्र महाजनी यांनी अभिनयाच्या कारकीर्दीत हिंदी, मराठी चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांचा देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, हळदी कुंकू हे चित्रपट तुफान गाजले आहेत. रंजना, उषा नाईक, आशा काळे या दिग्गज अभिनेत्रींसोबत महाजनी यांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्याकाळी विशेष गाजली होती.
महाजनी यांनी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. 1997 मधील 'सत्तेसाठी काहीही' या चित्रपटाची त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती.
देऊळबंद फेम अभिनेता गश्मिर महाजनी हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा