Pocso act :अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता, उरळ येथील घटना

              ॲड. पप्पू मोरवाल 




भारतीय अलंकार 24

अकोला: वर्ष 2019 मध्ये पोलीस स्टेशन उरळ येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार मुलीच्या वडीलांनी दाखल केली होती. त्या आधारावर पोलीस स्टेशन उरळ येथे भा. द. वि.  कलम 354, 354 ड व पॉक्सो कायद्याची कलम 11 व 12 अन्वये आरोपी दिगांबर उगले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातून न्यायालयाने आरोपी दिगंबर उगले यांची निर्दोष मुक्तता केली आहे.


तक्रारीमध्ये आरोप लावण्यात आले होते की, आरोपी दिगांबर उगले हा मागील एक वर्षापासून त्यांची मुलीचा पाठलाग करीत होता. घटनेच्या दिवशी संध्याकाळी त्यांची मुलगी तुळसी जवळ दिवा लावत असतांना त्यांनी आरोपीला मुलीकडे वाईट नजरेने पाहतांना पाहिले होते. यावरून मुलीच्या वडिलांनी आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीच्या आधारे पी.एस.आई. किशोर मावस्कर यांनी तपास हाती घेवून आरोपी विरुद्ध भा. द. वि.  व पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला होता.


हे प्रकरण अकोला येथील संयुक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश  एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. परंतु साक्षीदारांचे बयाणातून सरकार पक्षाकडून आरोप सिद्ध होऊ शकले नाही. म्हणून न्यायालयाने आरोपी दिगांबर उगलेची निर्दोष सुटका केली.



आरोपीतर्फे ॲड. पप्पू मोरवाल, ॲड. राकेश पाली. ॲड. आनंद साबळे, ॲड. नागसेन तायडे यांनी काम पहिले.

टिप्पण्या