Maharashtra Political News: राज्यात राजकीय भूकंप ;अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ






भारतीय अलंकार 24

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सरकारला एक वर्ष पुर्ण होवून दोन दिवस उलटले असतानाच राज्यात आज नवा राजकीय भूकंप झाला आहे. 



अजित पवारांनी बंड केल्याने राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.




अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्माराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी  मंत्रिमंडळाची शपथ घेतली.




राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठींबा दिला आहे. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  तत्पूर्वी सर्व राजभवनात पोहचले होते.




दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील यांचा समावेश होता.


टिप्पण्या