- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा येथे राहुल नामदेव सरोदे यांचे प्लांट ग्रोथ प्रमोटर युनिट सुरू असताना, तेल्हारा पंचायत समितीचे कृषिअधिकरी यांचेकडे रासायनिक खत नसल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल नसतानाही बनावट खत निर्मिती कारखाना असून त्यांच्याकडे शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्यावरही खत निर्मिती करून शेतकऱ्यास विक्री करत शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली. आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी प्रयोगशाळेचा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला. आणि प्लांट ग्रोथ प्रमोटरचे परवाने असून कृषी अधिकारी यांनी पाहले नसल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भगतसिंग जगन्नाथ चव्हान यांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. कृषी अधिकारी यांनी 24 जुन 2023 चे संध्याकाळी छापा टाकत हा रासायनिक खत असल्याच्या संशयावरुन गोडाऊन सील करुन मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणी तेल्हारा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीचे वकील ॲड. गजानन रामकृष्ण भोपळे यांनी युक्तिवाद करताना संगीतले की, आरोपी हे स्वत: पोलिस स्टेशनला हजर झाले होते. तपासात आरोपी विरुद्ध कुण्याही व्यक्तीची किंवा शेतकऱ्याची फसवणूक केल्याची तक्रार नाही व जप्त मुद्देमालात कुठले ही रासायनिक खत नाही, हे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
आरोपी राहुल सरोदे यांनी प्लांट ग्रोथ प्रमोटरचे युनिट सुरू केले असून, त्याचे शासनाने दीलेल्या परवानग्या न्यायालयात दाखल केल्या. ज्या कृषी अधिकारी यांनी पाहिल्या नाहीत. आरोपी हा कोणत्याही प्रकारचे खत निर्मिती करत नसून, तपासात त्यासंबंधी कोणताही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला नाही. तसेच कृषी अधिकारी यांनी कोणत्याही प्रयोग शाळेचा अहवाल न घेताच खत निर्मिती कारखाना आहे आणि तो बनावट आहे असे सांगितले आहे. या मुद्द्यांवर न्यायालयाने तपास अधिकारी यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडे उत्तर नव्हते. त्यामूळे सर्व मुद्दे गृहित धरुन न्यायालयाने तपासावर ताशेरे ओढत आरोपीस जामीन मंजूर केला.
या प्रकरणी न्यायालयात ॲड गजानन रामकृष्ण भोपळे यांनी युक्तिवाद करित आरोपीची बाजु यशश्वीपणे मांडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा