court news: आलेगाव धर्मांतर प्रकरण: चारही आरोपींचा जामीन अर्ज मंजुर

.             आरोपी तर्फे वकील 



भारतीय अलंकार 24

अकोला: धर्मांतर करण्याकरिता युवकाला पैशाची लालसा देणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे आरोप असलेल्या चार आरोपींचा न्यायलयाने जामीन अर्ज मंजुर केला आहे. आलेगाव येथील हे धर्मांतर प्रकरण राज्यात गाजत आहे.



हकीकत अशा प्रकारे आहे की, पोलीस स्टेशन चान्नीच्या हद्दी मधील गांव मौजे आलेगांव येथील एका महिलेच्या तक्रारीवरून चार लोकां विरूध्द कलम 506, 34 भा.दं.वि. व अट्रॉसिटी अक्टचे कलम 3 (2) (va) चा गुन्हा चान्नी पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आला होता. तक्रार मध्ये आरोपी नं. (1) अल्ताफ, (2) अंसार (3) शेख तन्वीर (4) शेख अजीम यांनी फिर्यादीच्या मुलाचा धर्म परिवर्तन केला व फिर्यादीला धर्म परिवर्तन करण्याकरिता पैशाची आमिष दिली. अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून चारही आरोपींना 12 जुलै 2023 रोजी रात्री 2.08 वाजता गुन्हा दाखल करून तात्काळ 12 जुलैच्या रात्रीच अटक केली होती. 



दरम्यान काही राजकीय पक्षानी प्रकरणाची शहनिशा न करता पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याच्या उददेशाने गांव बंद केले होते. या प्रकरणाला विनाकारण जातीयवादचा रंग दिला होता. 




या गुन्हया मध्ये आरोपी क्रमांक 1 ते 4 तर्फे पहिले विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश अकोला यांचे न्यायालयात जामीन मिळण्याकरिता ॲड. अली रजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे, ॲड. आसीफ शेख (आलेगांव) यांनी आर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांनी न्यायालया समोर मुद्देसूद युक्तीवाद केला. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर  न्यायालयाने चारही आरोपींची जामीन अर्ज मंजुर केला.

टिप्पण्या