Court news: ॲट्रॉसिटी व विनयभंग प्रकरणातून सबळ पुरावा अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता; शिवसेना वसाहत मधील घटना

आरोपी तर्फे वकील मो.इलयास शेखानी 




भारतीय अलंकार 24

अकोला:  घरात घुसून विनयभंग, जातीविषयक शिवीगाळ व संपूर्ण कुटुंबास जीवाने मारण्याची देण्याच्या प्रकरणातून अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. 



शिवसेना वसाहतीतील 37 वर्षीय आदिवासी समाजाच्या महिलेने शिवसेना वसाहतीतील रवी महादेव मानकर याने आपल्या घरात घुसून आपला विनयभंग केला. आपणास जातिवाचक शिवीगाळ केली व नवऱ्यासमवेत कुटुंबास जीवाने मारण्याची धमकी दिल्याची तक्रार फिर्यादी महिलेने जुने शहर पोलीस ठाण्यात 16 डिसेंबर 2017 रोजी दिली होती. 



जुने शहर पोलिसांनी या संदर्भात तपास करून आरोपी रवी महादेव मानकर याच्यावर गुन्हा र.न. 386/17 अन्वये भादवि 452, 354,(अ) (i, i v) 294, 506 व अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपी रवी महादेव मानकर यास अटक केली. 



या प्रकरणाची सुनावणी चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. गव्हाणे यांच्या न्यायालयात झाली. या संदर्भात फिर्यादीच्या वतीने न्यायालयात सबळ पुरावे उपलब्ध होऊ शकले नसल्यामुळे सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने अखेर आरोपी रवी महादेव मानकर याची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. मो. इलयास शेखानी यांनी कामकाज बघितले. त्यांना ॲड. पी. बी. मेश्राम यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या