political news: भाजपच्या महासभा निम्मित शहर झाले भाजपामय; देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन








भारतीय अलंकार 24

अकोला: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांची अकोला लोकसभा मतदार संघातील जाहीर महासभा अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे रविवार 18 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सभेसाठी मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला आहे.


विश्वातील सर्वात मोठी पार्टी व सभासद असलेले पार्टीचे नेते व अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मानाचे स्थान प्राप्त करून देणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्षे झाली आहे. सेवा सुशासन, गरीब, लोककल्याण,  महाजनसंपर्क अभियानांतर्गत राजराजेश्वर नगरीमध्ये ऐतिहासिक 2023 ची विशाल जाहीर सभेचे आयोजन केले आहे. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस येणार आहेत. ना. फडणवीस यांचे विचार ऐकण्यासाठी   अकोला पंचक्रोशीतील जनता उपस्थित राहणार आहेत. सभे निम्मित संपुर्ण शहर भाजपामय करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आली आहेत. संपूर्ण शहर भाजपा झेंड्याने व भाजपा नेत्यांची कटआऊट लावून सजविण्यात आले आहे.



स्थानिक क्रिकेट मैदानावर रविवार होणाऱ्या जाहीर सभेसाठी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाटे क्लब, रतनलाल प्लॉट येथील उर्दू शाळा, आगरकर कन्या शाळा  या  ठीकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.



या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे समवेत भाजपा प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा भाजपा गट नेते व या अभियानाचे संयोजक आ प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार आहे. यावेळी या सभेत विविध पक्षांचे व सामाजिक क्षेत्रामध्ये कामकरणारे सामाजिक कार्यकर्ते, भाजपात प्रवेश करणार आहेत. 




ना. फडणवीस यांचे स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक तसेच संपूर्ण शहर भाजपा झेंड्याने व त्यांचे कटआऊट लाऊन सजविण्यात आले आहे. आ देवेंद्र फडणवीस नागपूर येथून विमानाने आल्यानंतर त्यांना विमानतळावरून संतोष शिवरकर भाजयुमो जिल्हा अध्यक्ष व अकोट पंचायत समिती उप सभापती व अनुप धोत्रे, अंबादास उमाळे यांचे नेतृत्वा खाली मोटार सायकल  रैलीने सभास्थानावर आणण्यात येणार आहे. 




पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी 370 कलम, श्रीराम मंदिर, तीन तलाख,  संस्कृती संवर्धन सोबत ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसी आयोग तसेच वेगवेगळ्या योजना सुरु करून साबका साथ साबका  विकास साबका प्रयासाना भारताला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न, योग विद्या 121 देशांमध्ये पोहोचविण्याचे काम करून  भारत आयुष्मान योजना, रेल्वेत अंनेक  सुविधा उपलब्ध करून जनतेत विश्वास निर्माण केला. 

राज्यातील डबल इंजिन सरकार  एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली सरकारने मातृशक्ती  सन्मानार्थ एसटी मध्ये 50 % सवलत, एक रुपयात पिक विमा योजना, शेततळे तसेच मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक मतदार संघास भरघोस निधी दिली. अशा सरकारचे अभिनंदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी अकोला जिल्ह्यातून एक लाख पेक्षा नागरिक अकोला क्रिकेट मैदान परिसरात एकत्र येणार आहेत.




खासदार संजय धोत्रे यांचे नेतृत्वाखाली प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर  यांचे योग्य नियोजन व आपले सहकारी आमदार गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, यांच्या सातत्याने ही सभा ऐतिहासिक करण्याचे दृष्टीने भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी, शेतकरी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, अनुसूचित जाती जमाती आघाडी, विविध आघाड्या, सेल कार्यक्रम भव्य दिव्य करण्याचे दृष्टीने कामाला लागले आहेत.




   

माजी खासदार अनंत देशमुख, ॲड. नकुल देशमुख, विजय जाधव, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, किशोर  मांगटे पाटील, तेजराव थोरात,बळीराम सिरस्कर, अर्चना मसने, सुमन गवांडे,  गीतांजली शेगोकार, मनोहर राहणे, प्रकाश गुजराथी, बाळासाहेब अपोतीक्रर, श्रावण इंगळे,  राजेश बेले,  डॉ शंकर वाकोडे, शंकर बोरकर,  कृष्णा शर्मा, विजय मालोकार, प्रभाकर मानकर, हिरासिंग राठोड, चंद्रशेखर पांडे, डॉ अभय जैन, गजानन उंबरकर, महेंद्र गोयंका, अशोक गावंडे, विलास बोडखे, राजेश नागमते, राजेश रावणक्रर, राजू दुतोंडे, अमोल साबळे, रमेश लोहकपुरे, रमण जैन, अभिजित गहीलोट, राजू  उगले, राजू काकड,  रितेश साबाजकर, भूषण कोकाटे, डॉ अमित कावरे, गणेश तायडे, श्रीकृष्ण मोरखडे, बाळासाहेब नेरकर, कुसुम भगत, संतोष शिवरकर, प्रवीण डीक्कर,  उमेश पवार, डॉ मनमोहन व्यास,  देवेंद्र देवर, प्रवीण हगवणे, मधुकर पाटकर, विवेक भरणे,  दत्तू  पाटील, पंकज वाडीवाले, शेरू भाई, राहुल देशमुख, हरीश आलमचंदानी, ॲड. देवाशिष काकड, संतोष पांडे, निलेश निनोरे, गणेश अंधारे, अमोल गोगे, अमोल गीते, सिदार्थ शर्मा, माधव मानकर, केशव ताथोड, संजय गोटफोडे, संजय जिरापुरे, संजय गोडा, डॉ विनोद बोर्डे, अक्षर गंगाखेडकर, संजय बडोने, माधुरी बडोने, चंदा ठाकूर, शारदा ढोरे, मनीषा भन्साळी, पल्लवी मोरे, अनुराधा मावकर, हरीश काळे, आरती घोगलीया, अर्चना चौधरी, सारीका जैस्वाल, सुनीता अग्रवाल, शारदा ढोरे, रश्मी अवचार, शारदा खेडकर, बाळ ताले, दीप मानवानी, नानक राजपाल,प्रशांत देशपांडे, प्रशांत पांडे, प्रवीण ठाकरे,  वैशाली शेळके, सतीश  ढगे, तुषार भिरड, जयंत मसने, रवी गावंडे अंबादास उमाळे, रंजना विंचनकर, योगीता पावसाळे, माधुरी क्षीरसागर, अनिल गरड, वैभव माहोरे,  भरत काळमेघ, अनिल गावंडे, दिगंबर गावंडे,  दिलीप देशमुख,  जयश्री दुबे, दिलीप  मिश्रा,  लोकेश तिवारी, प्रकाश श्रीमाली, अभिमन्यू नळकांडे, जाह्न्वी डोंगरे, प्रा. अनुप शर्मा, कृष्ण शर्मा, ॲड. सुभाष ठाकूर, सौरभ शर्मा, गिरीराज तिवारी, निलेश ठेवा, अभिजित बांगर, कुणाल शिंदे, गोपाल मुळे, नितीन गवळी, मानोज शाहू, पवन महाले, कैलाश रणपिसे, विजय इंगळे, अजय शर्मा, आशिष पवित्रकर, सोनी अहुजा, मंगला सोनावणे, धनंजय धबाले, विजय हळदे, आम्रपाली उपर्वट, बाळू वरठे, रश्मी कायंदे, शकुन्ताला जाधव, निशा कडी, निता बागडे, सोनल अग्रवाल, सोनल शर्मा,   किशोर कुचके, मोहन पारधी, अक्षय जोशी सह शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न करीत आहेत.

टिप्पण्या