ITI Admission Process Begins: आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; 11 जुलैपर्यंत अर्ज मागविले





भारतीय अलंकार 24

अकोला, दि.14 : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दि. 11 जुलैपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य गजानन व्ही. चोपडे यांनी केले.




व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाले आहे. राज्यात 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अनुक्रमे 95 हजार 380 व 59 हजार 12 अशा एकूण 1 लाख 54 हजार 392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 5 हजार 124 जागांची वाढ झाली आहे.


           

प्रवेश सत्र ऑगस्ट 2023 करिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथेही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.dvetadmission.in या संकेतस्थळावर सादर करावा.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी एकूण 24 व्यवसायाभिमुख व्यवसाय असून त्यात नऊ व्यवसाय एक वर्ष मुदतीचे तर 15 व्यवसाय दोन वर्ष मुदतीचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्ज दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे 11 जुलै 2023 च्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतरच प्रवेश निश्चिती करण्यात येईल. व्यवसाय व संस्था निहाय विकल्प, प्रवेश अर्ज निश्चिती 12 जुलैचे सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील.  सविस्तर वेळापत्रक व माहिती पुस्तक www.dvetadmission.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रतनलाल प्लॉट, अकोला येथे संपर्क साधवा.

टिप्पण्या