Court news: गायींची कत्तल करुन गोमास विक्री केल्याचे प्रकरणात आरोपी याचा अटकपूर्व जमानात अर्ज नामंजुर



भारतीय अलंकार 24

अकोट, दि.१७: अकोट येथिल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे फाईलवरील अपराध क्र. २३/२३ भा.द.वि. कलम ३७९ (३४) सहकलम ५.५ क प्राणी संरक्षण अधिनियम या गुन्ह्यातील आरोपी जमीरोहिन उर्फ जम्मु अलीमोद्दन वय २६ वर्ष रा. ताहपुरा अकोट याचा गायींची कत्तल करुन गायीचे मास विक्री केल्याबद्दलचे या प्रकरणात दाखल अटकपूर्व जमानत अर्ज नामंजुर केला आहे.


या प्रकरणाची हकीकत अशी आहे की या प्रकरणातील फिर्यादी सुनिल महादेवराव सावरकर रा. चंडिकापुर ता. अकोट जि. अकोला यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दि. १२/०१/२०२३ रोजी त्यांच्या मालकी हक्काचे गोवंश जातीचे जनावरे गायी, बैल व वासरे यांना चारा पाणी करुन घरासमोर रात्रीचे दरम्यान बांधले व दुसऱ्या दिवशी दि. १३/०१/२०२३ रोजीचे सकाळी ५ वाजता उठुन पाहले असता त्यामधील बैल, ३ गाई व दोन वासरांपैकी २ गाई दिसल्या नाहीत त्यांचे दोर कापलेले दिसले आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आल्या नाही १ लाल रंगाची गाय व १ पांढऱ्या रंगाची गाय या दोन गाईची एकुण किंमत रु. १६,०००/- सोळा हजार रु. कोणीतरी अ त इसमाचे चोरुन नेले आहे याच फिर्यादीवरुन वरील प्रमाणे गुन्हा अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्री. नितीन देशमुख यांनी दाखल करुन तपासामध्ये घेतला.


या प्रकरणात उपरोक्त फरार आरोपी जमीरोद्दिन याचे अटकपूर्व जमानत अर्जाच्या युक्तीवादामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे न्यायालयात युक्तीवाद केला की या गुन्ह्याचे तपासात निश्पन्न आरोपी कुदरत खाँ उर्फ जावेद अहेसान खाँ वय २२ वर्ष रा. मजेठीया प्लॉट अकोट यांने वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिल्याने या आरोपीकडुन पंचासमक्ष मेमोरँडम पंचनामा प्रमाणे या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन मास विक्री केल्याचे ठिकाण दाखवले व गुन्ह्यात गाईची कत्तल करुन विक्री केलेले ४००० रु पंचासमक्ष काढुन दिले व पुराव्याकरीता ताब्यात घेतले आहेत. तसेच यातील दुसरा आरोपी नामे रमीज राजा उर्फ सोनु अब्दुल नसीर पटेल वय २२ वर्ष रा. ग्राम वडाळी सटवाई ता. अकोट जि. अकोला या आरोपीने देखिल वरील गुन्ह्याची कबुली दोन पंचासमक्ष दिल्याने गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईची कत्तल करुन विक्री केलेले ५००० रु दोन पंचासमक्ष या आरोपीने काढुन दिले व ते देखिल पोलीसांनी पुराव्याकामी जप्त करुन पंचानामा करुन ताब्यात घेलते आहे.


तसेच या दोन्ही आरोपींनी या गुन्ह्यातील साथीदार आरोपी नामे फिरोज खान रफिक खान वय ४१ वर्ष रा. उस्मान पुरा, बुधवारा अंजनगांव सुर्जी याला देखिल पोलीसांनी अंजनगांव सुर्जी येथून अटक केले व त्याच्याकडे असलेली टाटा इंडिगो क्र. एम.एच ४९ एफ ०३७३ चे कागदपत्रांबाबत व त्याने गुन्हा करतेवेळी सोबत असलेले त्याचे साथीदार मुजाहीद रा. अकोट व जम्मू उर्फ जमिरोद्दिन रा. अकोट असे पोलीसांना सांगितले. अकोट पोलीसांनी फरार आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन रा. ताहपुरा अकोट येथे जावुन पोलीसांनी विचार पुस केली असता हा आरोपी मिळुन आला नाही व तो फरार आहे.


तसेच या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी अतिरिक्त मुद्दे युक्तीवादामध्ये वि. कोर्टासमोर सांगितले की आरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन रा. ताहपुरा अकोट याने वरील गुन्हा गंभीर स्वरुपाचा केला असुन अकोट शहर हे अति संवेदनशिल असल्याने व यातील आरोपींनी हिंदु समाजाच्या गाई व बैलांची कत्तलीसाठी चोरी केली असल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपी साथीदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन त्यांनी चोरलेल्या गुन्ह्यातील गाईंची कत्तल करुन त्या विक्री केल्या असल्याचे सांगितल्याने आरोपींच्या हिश्यावर आलेले रुपये हे गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त केलेले आहेत. तसेच या गुन्ह्यातील अर्जदार आरोपी याने या अगोदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन व इतर ठिकाणी किती गोवंश जातीचे जनावरांची चोरी केली आहे व कत्तल केली आहे व कोणास विक्री केले आहे व त्याची कशी विल्हेवाट लावली आहे याबाबत सखोल विचारपुस करण्याकरीता या अरोपीची पोलीस कस्टडी मध्ये विचारपुस होणे आवश्यक आहे. तसेच या गुन्ह्यातील हा अर्जदार आरोपी गुन्हेगार प्रवृत्तीचा असुन याचे विरुध्द पोलीस स्टेशन अकोट शहर येथे गोवंशी जातीचे जनावरे, चोरीचे गुन्हे व इतरही गुन्हे दाखल असुन यावर न्यायालयामध्ये कोर्ट केसेस प्रलंबित आहेत. त्याच प्रमाणे या गुन्ह्यातील अर्जदार आरोपी याची आनखीन १ साथिदार सै. मजुहीद सै. मोहसिन वय २२ वर्ष रा. कागंर पुरा अकोट हा कोठे लपुन बसला आहे या बाबत देखिल विचारपुस करुन या साथिदाराला देखिल अटक करणे बाकी आहे. तसेच या गुन्ह्यातील हा अर्जदार आरोपी याने या गुन्ह्यात चोरुन नेलेल्या गाईंची कत्तल करुन विल्हेवाट कोठे व कशी लावली याबाबत देखिल या अरोपीला विचारणा करणे आवश्यक आहे. तसेच वरील गुन्ह्या व्यतिरिक्त या पुर्वी अटक असलेले अपराध नं. ३३१/ २०२२ मधील या अर्जदार आरोपीचे साथिदार यांनी गौवंश जातीचे जनावर चोरी केले असलेबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केली आहे. वरील सर्व परिस्थिती व मुद्दे लक्षात घेता सरकारी वकील अजित देशमुख यांनी सरकारतर्फे वि न्यायालयाला विनंती केली की वरील गुन्ह्यातील फरार अरोपी जमिरोद्दिन उर्फ जम्मु अलीमोद्दिन रा. ताहपुरा अकोट याला अटकपूर्व जामीन दिल्यास तो या प्रकरणातील साक्षीदार यांचेवर दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वि. कोर्टाने वरील प्रकरणातील अटकपूर्व जमानत अर्ज कृपया नामंजुर करावा. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि. कोर्टाने आरोपीचा अटकपुर्व जमानत अर्ज नामंजुर करण्यात आला.

टिप्पण्या