- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मोदी @ 9 भाजप महाजनसंपर्क सभा
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही तशी वेळ आली तर मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेल, असे शिवसेना प्रमुखांनी सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा विचार घेतला म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांचे दुकान बंद केले व मूळ शिवसेना शिंदे सोबत घेतले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था कोण होतास तू काय झालास तू असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे रविवार 18, जुन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन.डी.ए सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ 9 भाजप महाजनसंपर्क सभा पार पडली. या सभेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले.
मंचावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अभियानाचे संयोजक व आमदार प्रवीण दरेकर, कर्नाटकचे माजी मंत्री आमदार अरविंद लीम्बावले, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, जयंत डेहनकर, रश्मी जाधव, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, विजय अग्रवाल, आमदार वसंत खंडेलवाल, डॉ.रणजित पाटील, आ राजेंद्र पाटणी, आ. संजय कुटे, आ. आकाश पुंडकर, चैनसुख संचेती, अनुप धोत्रे, अनंतराव देशमुख, जयंत मसने, किशोर मांगटे आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
एखादा व्यक्ती प्रसिद्ध होतो तेव्हा त्याच्यावर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप केला जातो आहे, मात्र कोणाच्या बापाचा बापही उतरला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असल्याचे फडणविस म्हणाले.
आतापर्यंत उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट ही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडून पुरविण्यात येत होती, आता उद्धव ठाकरे यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी होऊन बसली आहे. 2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.',असे देखील फडणविस म्हणाले.
देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्ष हटवू शकत नाही. गेल्या वेळी 52 नेते एकत्र आले होते आता त्यात उध्वव ठाकरे यांची ही भर पडली आहे,' असा खोचक टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संस्कृती संवर्धनासोबत जागतिक स्तरावर मानाचे स्थान प्राप्त करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन सर्व क्षेत्राचा विकास केला व शेतकरी सन्मान योजना, जंण धन योजना, पंतप्रधान आयुष्मान योजना तसेच आदिवासी, ओबीसी मातृशक्ती यांचा सन्मान करून महाराष्ट्राच्या व देशाच्या भौगोलीक, सामाजिक विकासाचा मार्ग सुकर केला. सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. पैसे नसल्याने कोणीही मरणार नाही, हे सरकार जनसामान्यांचे कल्याण करणार आहे, समाजाला दिशा देण्याचे काम सरकारने केले. राज्यातील भाजपा शिवसेना सरकार निधी कमी पडू देणार नाही व देशाच्या विकासासाठी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहून समाज व राष्ट्र निर्माणात पंतप्रधानांच्या प्रत्येक कामाला जनतेने साथ दिली. महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वास सार्थ करून 2024 मध्ये सर्वात जास्त खासदार पाठविणार असल्याचेही ते म्हणाले.
या वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धाव ठाकरे सेनेवर जोरदार टीका केली. डबल इंजीन सरकार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली सामाजिक विकास करण्यासाठी कटीबद्द असल्याचे सांगितले. मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून देशाला विकासाची दिशा देण्याचा प्रयत्न केला असून देशाचे नाव उंचावले असल्याचे बावनकुळे म्हणाले.
तत्पूर्वी प्रस्ताविक महाराष्ट्र भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा यांनी केले.
महासभेतील क्षणचित्रे व भाषणातील वाक्ये
मोबाईलच टॉर्च लावून देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद मानले.
मोदींवर टीका करणारे विदेश वारी करतात.
सोबतच भाजपच्या मोबाईल नंबर वर मिस कॉल देऊन ही नरेंद्र मोदींना पाठिंबा.
कन्फ्युज करून मत घेणारी पार्टी , काँग्रेस आणि राष्ट्रवादी
शरद पवार सरकार मध्ये असतांना व्यापाऱ्यांची चिंता करत होते.
घर कोंबड्या घरून फेसबुक लाईव्ह करतात उद्धव ठाकरे यांना टोला.
देवेंद्र फडणवीस यांच भाषण सुरू . सर्वांचे आभार मानले. अकोल्याने सर्व रेकॉर्ड तोडले.
बावनकुळे यांच्या कामाची दहशत उद्धव ठाकरे यांना
उद्धव ठाकरेचे स्क्रिप्ट रायटर शिंदे गटात गेले
तुम्हाला कुठं कुठ आग होत आहे ते आम्हाला माहीत आहे.
कोण होतास तू काय झालास तू - उद्धव ठाकरे यांना टोला
घरात बसून जे राजकारण करतात त्यांना मोदी काय माहित.
परदेशात मोदीजींमुळे भारताला सन्मान मिळाला.
10 लाख घर ओबीसी साठी आम्ही बांधत आहो.
वाहून जाणार पाणी साठा5 टीएमसी पाणी या ठिकाणी आणून हा सगळा भाग या ठिकाणी ओलिताखाली आणून हिरवा गार अशा प्रकारचा पश्चिम विदर्भ हा तयार करण्याचा या ठिकाणी निर्धार आपण केला.
मागचं सरकार घरी बसून काम करणार सरकार होतं... हे पवार साहेबांनीच सांगितलं.
काही लोक प्रयोग करून अशांतता पसरविण्याचे काम करीत आहे.
बाळासाहेब आंबेडकर ही औरंगजेबच्या कबरीवर गेले याची आम्हाला खंत वाटते. बाळासाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा