Akola crime: चौकीदाराचे बळजबरी हातपाय बांधून सिगारेटचे गोडावून फोडणारी टोळी गजाआड; 54 लाखाचा मुददेमाल हस्तगत






नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महिनाभरापूर्वी डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत असलेले  सिगारेटचे एक गोडवून फोडून जबरी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात स्थानीक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे. आरोपींकडून 54 लाखाचा मुददेमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. चौकीदाराचे हातपाय बांधून जबरी चोरी केल्याचा गुन्हा यातील आरोपींनी कबूल केला आहे.



अकोला जिल्हयात पोलीस स्टेशन डाबकी रोड हदद्तील राधा स्वामी सत्संगचे बाजुला असलेले मनोहर मोटवाणी याचे सिगरेटचे गोडावून वर 28 मे 2023 रोजीचे रात्री दोन वाजता च्या दरम्यान चौकीदाराचे बळजबरी हातपाय बांधून गोडावुनचे शटर वाकवुन गोडावून मधील 50 लाख रूपयेचा  मुद्देमाल अज्ञात तीन चोरटयानी जबरीने चोरून नेल्या बाबत डाबकी रोड पोलीस ठाण्यात  28 मे रोजी भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधिक्षक  सदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे ,  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष महल्ले व त्यांच्या चमूला जबरी चोरी गुन्हा उघडकीस आनणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार  23 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना गुप्त बातमी दारा कडुन माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला हददीतील नंदलाल मोटवाणी याचे राधा स्वामी संत्संग जवळील गोडावुनचे दोन चौकीदार यांचे जबरीने हातपाय बांधुन गोडावुनचे शटर तोडुन गोडावून मध्ये असलेला ITC विविध कंपनीची सिगरेट जबरीने चोरून नेणा-या तिन आरोपीन पैकी एक आरोपी आतीश सुनील मलीये (रा. गौसीया मज्जीद गुलजार पुरा अकोला) हा आहे. या माहितीवरून त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. विश्वासात घेवुन कौशल्यपूर्वक बारकाईने आरोपीची विचारपुस केली. आरोपीने त्याच्या मित्रांसोबत नंदलाल मोटवाणी याचे राधा स्वामी संत्संग जवळील गोडावूनचे दोन चौकीदार यांचे जबरीने हातपाय बांधुन गोडावुनचे शटर तोडुन गोडावून मध्ये असलेला ITC विविध कंपनीची सिगरेट जबरीने चोरून नेली बाबत कबुली दिली. 




या गुन्हयात एकुण चार आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये आतीश सुनिल मलीये वय 25 वर्ष धंदा. ड्रायव्हींग, रा. गौसीया मज्जीद गुलझारपुरा अकोला, भावेश गजानन भिरड वय 25 वर्ष धंदा. खाजगी नोकरी रा. गायत्री नगर जुनेशहर अकोला,  शाम सुखदेव ताथोड, वय 23 वर्ष धंदा. मजुरी, रा. गायत्री नगर जुने शहर अकोला व अन्य एक 20 वर्षीय आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन विविध ITC कंपनीचे सिगारेट किंमत एकुण 43 लाख 77 हजार, 850, दोन चार चाकी मालवाहू वाहन किंमत अंदाजे 8 लाख , दोन मोटार सायकल किंमत अंदाजे दोन लाख, चार  विविध कंपनीचे मोबाईल किंमत अंदाजे 40 हजार, दोन चाकु किंमत अंदाजे तीनशे रूपये असा एकुण 54,18,150 /- रुपयेचा मुददेमाल आरोपीतां कडुन हस्तगत करण्यात आला. आरोपींना पुढील तपास कामी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात आले.




ही कार्यवाही पोलीस अधिक्षक  संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक,  अभय डोंगरे,यांचे मार्गदर्शना खाली पोलिस निरिक्षक संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरिक्षक गोपाल ढोले, पोलीस अंमलदार फीरोज खान, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभीषेक पाठक, धिरज वानखडे, चालक हेमंत दापरवार यांनी केली.


टिप्पण्या