Unseasonal rains: अवकाळी पावसाचा फटका:कुलर, डेझर्ट विक्रीवर परिणाम; ग्राहक दुकानाकडे फिरकेना





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उन्हाच्या तडाखा पासून गारवा मिळविण्यासाठी उन्हाळ्याची चाहूल लागताच एसी, कूलर, डेझर्ट, पंखा, फ्रीजची मागणी वाढते. यंदा, मात्र अवकाळी पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने या उपकरणांच्या दुकानाकडे ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र अकोला बाजारपेठेत दिसत आहे.




मागील वर्षी मार्च एप्रिल महिन्यात एका दुकानातून एका दिवसात साधारण 18-20 कुलर विकल्या जात होते. यंदा मात्र मोठ्या मुश्कलीने एखादा कुलर विकल्या जात आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे बाजारपेठेचा आढावा घेतला असता माहिती समोर आली. अवकाळी पाऊस आणि ढगाळ गतवर्षीच्या तुलनेत मागणीवर परिणाम होऊन किमती स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.




दरम्यान मोटार पंप, अल्युमिनियम महागल्याने फायबर कूलर आणि डेझर्टच्या किंमतीत मागील वर्षी पेक्षा थोडी जस्त वाढ झालेली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शिवाय यावर्षी सातत्याने ढगाळ वातावरणामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचेही म्हणाले.




उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहर वासीयांना चटके बसायला सुरुवात होते. उन्हाळा वाढल्याने गारव्यासाठी कूलर, डेझर्ट खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. गारवा देणाऱ्या उपकरणांच्या

खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे वळतात. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण मुळे गतवर्षीच्या तुलनेत मागणीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.  




यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कूलर, डेझर्टमध्ये प्रत्येकी साधारण 250 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. फायबरचा दोन फूट छोटा कूलर 1800 रुपयांना होता, त्याची किंमत आता जवळ्पास 2100 रुपये झाली आहे. 3.5 फूट फायबर कूलर 3750 ते 4400 रुपयांना विक्री होत आहे. याशिवाय लोखंडी डेझर्टच्या किंमती वाढल्या आहेत. 2 फूट डेझर्ट कूलर 1700१ रुपयांवरून 1900 रुपयांवर गेला आहे. तर, 2.5 फूट डेझर्ट 2750 रुपये, 3 फूट 3750 रुपये तर 4 फूट उंचीचा डेझर्ट 6 ते 7 हजारांवर पोहचला आहे. मोटार पंप, पत्र्याचा खर्च वाढल्याने दरवाढ झाली.

कूलर, डेझर्टच्या किंमती गतवर्षीपेक्षा 250 ते 300 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वच प्रकारच्या कूलर आणि डेझर्टच्याही दरवाढ आहे



अवकाळी पावसाचा व्यवसायावर परिणाम झाला. ढगाळ वातावरणामुळे एसी, कूलरच्या किंमती स्थिर असून, सध्या समर ऑफरवर विक्री सुरू आहे. बॅण्डेड कूलर 10 हजारांच्या पुढे आहेत. ऊन वाढल्यावर कूलर आणि डेझर्ट उपकरण विक्री जास्त होईल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.




ऑनलाईन सेल

याशिवाय उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ई-कॉमर्स साइट व ॲपने सेल सुरू केला. यामधे  फॅन, एअर कंडीशनर (ए सी), कुलर, रिफ्ररेजिरेटर सारखे प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट दिल्या गेले. याचा देखील ऑफलाईन विक्रीवर परिणाम झाला असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.




किमती स्थिर 

"अवकाळी पावसाचा सद्य स्थितीत व्यवसायावर परिणाम झाला आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे एसी, कूलरच्या किंमती स्थिर झाल्या आहेत. उन्हाचा पारा चढला तर गारवा देणारे उपकरणांची विक्री जोमात होण्याची शक्यता आहे. "

अमित दिगंबर

इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायी 







टिप्पण्या