spirituality-shiv-mahapuran-katha: जन्म दात्यांच्या श्रमांची, त्यागाची किंमत जणावी- प्रदीप महाराज मिश्रा यांचे युवतींना आवाहन

*आज कथा मंडप झाले भावूक 



भारतीय अलंकार 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सध्या देशात आई वडिलांच्या भावना, इच्छा मारून पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, असे करतांना मुली आपल्या जन्मदात्याला आणि त्यांच्या श्रमांना दुर्लक्षित करून लग्न करीत आहेत, हे प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी मुलींनी  आपल्या जन्म दात्यांच्या श्रमांना, त्यांच्या त्यागाची किंमत करून त्यांनी आपल्या वडिलांना कन्यादानाची संधी द्यावी, कन्या दानाचे पुण्य त्यांच्या पदरात टाकावेत, असे आवाहन आज स्वामी समर्थ श्री शिव महा पुराण कथेच्या पाचव्या दिवशी कथा वाचन करतांना केले  


पं प्रदीप महाराज मिश्रा यांनी सांगितले की,  मुलगा एकाच कुळाचा उद्धार करते. मात्र एक मुलगी दोन कुळांचे उध्दार करते. ज्यांच्या घरात मुलगी असते ते भाग्यवान असतात. नारी सन्मान करण्यासाठी ज्याला मुलगी आहे, त्यालाच  निवडणूक लढवण्यासाठी तिकीट द्या. कारण  मुलगी भाग्य घडवते. वडिलांना मुली जास्त प्रिय असतात. मुलगी ही बापाची संपत्ती असते. त्यामुळे प्रसंगी कर्ज घेऊन बाप आपल्या मुलीचे लग्न लावून देतो. त्यामुळे  आदर करा आणि त्यांना कन्यादान करण्याची संधी उपलब्ध करून द्या, असे भावनिक आवाहन महाराजांनी करताच कथा  मंडपात उपस्थित सर्वच भाविकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.  




या कथेसोबतच आज श्री शिव महा पुराण कथेच्या पाचव्या दिवशी  राणी तारामतीच्या चपलांमुळे राजा हरिश्चंद्राने भगवान शिवाचे दर्शन घेतले असल्याची कथा ऐकवली. राणी तारामती राजा हरिश्चंद्राला अंधारात ठेऊन महापुराण कथा ऐकायला जात असे.त्यामुळे राजा हरिश्चंद्र यांना संशयाने घेरला होते.नंतर दुसऱ्या दिवशी राणी तारामतीचा पाठलाग करत राजा गेले. तेंव्हा राणी कथा ऐकत बसलेली पाहून राजा हरिश्चंद्र यांचा संशय गळून पडला. त्यांनी घरी परतताना तिथे राणीची जुती उचलली आणि घरी येऊन ती जुती  पेटीत ठेवून झोपले. आपल्या जुतीच्या  जोडीतील एक जुती हरवली गेल्याने भक्तीभावात बुडालेली राणी तारामती काळजीत पडली. या चिंतेत राणी घरी आली. तेव्हा तिला दोन्ही जुतीचा जोड   आढळून आला. सकाळी राजा हरिश्चंद्राला राणीच्या चपलांसह राणीचे लपवलेली जुती परत आढळली असल्याने राजा हरिश्चंद्रचा देवावर विश्वास बसला. आणि दुसऱ्या दिवशी राजा हरिश्चंद्र राणी तारामतीसोबत कथा ऐकायला गेला, आणि भक्ती म्हणून  भक्तांचे जोडे आणि चप्पल पुसून ठेवत होते. हे पाहून भगवान शंकर चप्पल न घालता माता पार्वतीसोबत कथेच्या ठिकाणी म्हाताऱ्याच्या रुपात पोहोचले. त्यानंतर राजा हरिश्चंद्राने देवाने चप्पल न घातल्याने देवाचे पायच पुसले आणि शिवमहापुराणातील कथा जिथे पुढे जाते, त्याच पद्धतीने देवाचे दर्शन घेतले. ज्यामध्ये लाखो लोक भक्ती कथा ऐकण्यासाठी येतात. तिथे देव स्वतः येऊन दर्शन देतो. भक्तीमध्ये खूप शक्ती आहे, असे ही महाराज म्हणाले.




पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांच्या सुमधुर भाषणातून अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे  रुपेश चौरसिया व विजय दुबे यांच्या तर्फे 5 मे ते 11 मे दरम्यान स्वामी समर्थ श्री शिव महापुराण कथेचे आयोजन केले आहे. दुपारी बालकथा वाचक पं.श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी  लाखो भाविकांची गर्दी होत आहे.




सर्व सुखाचे सोबती, दु:खात केवळ परमेश्वर 



श्रीकृष्ण महाराज दुबे : श्रीमद भागवत कथा


अकोला: या विश्वात प्रत्येक जण सुखाचा सोबती आहे. दु:खात कुणी साथ देत नाही. हे सत्य आम्ही समजून घेणे आवश्यक आहे. दु:खात केवळ प्रभु परमेश्वर तुमच्यासाठी धाऊन येईल, असे प्रतिपादन श्रीकृष्ण महाराज दुबे यांनी केले.


जिल्ह्यातील म्हैसपूर येथे 5 मेपासून 11 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ  शिव महापुराण कथा पं. प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून सुरु आहे. तर त्याच कथास्थळी दुपारी साडेतीन वाजता पासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत बाल कथावाचक पं. श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा प्रारंभ झाली आहे. या कथा वाचनाच्या चौथ्या दिवशी श्रीकृष्ण महाराज दुबे यांनी एका बलवान हत्तीची कथा सांगून जीवनाचे सत्य उपस्थिता समोर उलगडले. 




ते म्हणाले, की पर्वतावर एक हत्ती राहत होता. तो खूप मोठा व बलवान होता. त्याला मोठमोठे सिंह भित होते. त्याला त्याचा गर्व होता. एके दिवशी तो आपल्या परिवारासह सरोवरात स्नानाला गेला. स्नान केल्यानंतर तो सरोवरात जलक्रीडा करु लागला. त्याने सरोवरातील पाणी गढूळ केले. त्यामुळे सरोवरातील मगर क्रोधित झाला. त्याने हत्तीचा पाय पकडला. त्याला वाटले तुच्छ प्राणी आहे, काय करेल. मात्र मगर सोडत नव्हता. त्याने आपल्या कुटुंबियांना आवाज दिला. मात्र ते जाऊ लागले. तो म्हणाला अरे मला सोडून कुठे जाता. ते म्हणाले तुम्ही तर मरणार आम्ही का मरायचे? तेव्हा त्याला विरह झाला. त्याला कळले आपल्या सुखात सर्व सोबती असतात. मात्र दु:खात कुणीच साथ देत नाही. फक्त परमेश्वर धावून येतो ही बाब हत्तीला कळली  मात्र मानवाला कळले नाही. त्याने देवाचा धावा केला अन् देवाने त्याची सुटका केली. म्हणून सर्व सुखाचे सोबती असतात. दु:खात कुणी साथ देत नाही. मात्र परमेश्वर धावून येतो. म्हणून संसार सुखाचा मोह टाळून परमेश्वराचे स्मरण करा. तोच दु:खात मदत करेल, असे हितोपदेश श्रीकृष्ण महाराज दुबे यांनी केला. त्यांनी संतांचे महात्म्य अन् चार युग त्रेता, द्वापार, सतयुग आणि कलीयुगाचा महिमा कथित  केली . कथा श्रवणास भाविकांची लाखोंच्या संख्येने  गर्दी होती.





टिप्पण्या