spirituality-shiv-mahapuran-katha: बनावटी, दिखावटी आणि सजावटी जीवन जगू नका- पंडित प्रदीप मिश्रा



वाढत्या गर्दीमुळे महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी जागा मिळेल तिथे भाविक बसत आहेत. 





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:श्री स्वामी समर्थ महाशिवपुराण कथेत आज सोमवारी चौथ्या दिवशी पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांनी उपस्थित सर्व महिला भाविकांना संबोधित करताना सांगितले की, गर्भावस्थेत हॉटेल किंवा रस्त्यावरचे अन्न खाऊ नका, फक्त गाईचे दूध प्या आणि  सात्विक भोजन करा, जेणेकरून येणारे बाळ सुदृढ व सुसंस्कृत होईल, असे सांगितले. 



आज श्री स्वामी समर्थ महाशिवपुराण कथाचे चौथे पुष्प गुंफतांना पं प्रदीप महाराज मिश्रा यांनी 'बनावटी, दिखावटी आणि सजावटी जीवन जगू नका' या विषयावरील कथा ऐकवली. कथा ऐकण्यासाठी दररोज गर्दी वाढतच आहे. लाखो भाविकांची वाढती गर्दी पाहता कथा ऐकण्यासाठी आलेले भाविक  त्यांना जिथे जागा मिळेल तिथे  बसून कथा श्रवण करीत आहेत.



आज चौथ्या दिवशी प. प्रदीप मिश्रा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या श्वान पथकाने तपासणी केली आहे.  




संत स्वामी समर्थांच्या अवतारानंतर  प्रारंभीच्या आठ वर्षे फक्त ओमचे उच्चरणं केले. तर संत  गजानन महाराज यांनी गण गण गणात बोते चा उच्चरणं केले म्हणून या संताना भगवान शिवाचा अंश असल्याचे म्हटले आहे,असे पंडित मिश्रा यांनी सांगितले. 






अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर  गावात होत असलेली ही कथा साठी  आयोजक आणि गावकऱ्यांनी तसेच सामाजिक संस्था यांनी  पाणी, जेवण, सरबत सह कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.





महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे -पं प्रदीप महाराज 




अकोला: शेगाव,अक्कलकोट सह विविध भागात संतांचा वास आहे त्यामुळे संत भूमीतून वाहणारा वारा राज्यभर असतो. त्यामुळेच या संत आशीर्वादानेच राज्यात कुणीही उपाशी राहत नाही. अकोल्यात वाहणारा वारा कुणालाही उपाशी ठेवित नाही.असे म्हणतात की यात संत गजानन महाराजांची कृपा आहे,म्हणूनच तेथे येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची कधीच कमतरता भासत नाही. किंवा एखाद्या भक्ताला उपाशी असल्याने चक्कर आली किंवा आजारी पडला, असे प्रकार होत नाहीत असे श्री स्वामी समर्थ महाशिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशीची कथा सांगतांना पं.प्रदीप मिश्रा यांनी महापुराण कथेचे तिसरे पुष्प गुंफतांना सांगितले. 



संत गजानन महाराज आणि राज्यातील इतर संतांसह श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महाराष्ट्राचा उद्धार झाला.कारण संत हे ईश्वरांचा अंश आहेत  त्यामुळे आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी संत विविध प्रकारचे रूप धारण करून भक्तांना दुखमुक्त करण्याचा प्रयत्न करीत असतात कोरोना असो की इतर कोणत्याही प्रकारची महामारी असो संतांना आपल्या भक्तांच्या साठी अश्या महामारीवर मात करावी लागते त्याचमुळे संत सहवासाने जनते ला सुरक्षितता मिळत आहे असे सांगितले. रविवारी स्वामी समर्थ शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशीही लाखो भाविक श्री स्वामी समर्थ महाशिवपुराण कथा ऐकण्यासाठी पोहोचले आहेत.  आयोजकांनी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे. मात्र अपेक्षित पेक्षा जास्त संख्येने भाविकांचे लोंढे येत असल्याने भाविकांच्या सोईमध्ये व्यत्यय येत असल्याचे पाहून अकोला शहरातील सामाजिक संस्थांनी दायित्वाचा हात पुढे करत  विस्कळीत होऊ पाहणारी व्यवस्था  सुरळीत करण्यात यश मिळवले आहे. 



आयोजकांच्या 5 अंबुलन्स आणि वैद्यकीय टीम मध्ये  सूर्यचंद्र हॉस्पिटलने  पुढाकार घेत आपली वैद्यकीय सेवा प्रारंभ केली आहे. पोलीस प्रशासनाने सुध्दा भाविकांची सेवा कर्तव्यसोबत सुरू केली आहे. तर इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कथा श्रवण स्थळी उपस्थित राहून आपले कर्तव्याला प्राधान्य देत भाविकांच्या सेवेसाठी सरसावले आहेत.







भगवान शिवाचा कुणीही अपमान सहन करू शकत नाही 



श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकवली प्रजापती दक्ष  जीवनदान कथा 

 


अकोला : जिल्ह्यातील म्हैसपूर येथे 5 मे  पासून 11 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ  शिव महापुराण आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कथावाचक पं प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून तर दुपारी साडेतीन वाजता पासून  संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत बाल कथावाचक पं  

श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा प्रारंभ झाली आहे.




या कथा वाचनाच्या दुसऱ्या दिवशी पं श्रीकृष्ण महाराज दुबे यांनी भगवान शिवाचा अपमान करणाऱ्या प्रजापती दक्ष यांची कथा सांगतांना भगवान शिव यांचे नात्याने सासरे असणाऱ्या प्रजापती दक्ष यांची भगवान शिव यांचा अपमान केला गेला म्हणून शिव भक्तांनी रागाने त्यांची हत्या केली. त्यानंतर सर्व देव आणि भगवान ब्रम्हा आणि विष्णू यांनी भोलानाथ यांना आर्जव केल्यावर सासरे प्रजापती दक्ष यांना बकऱ्याचे शीर लावून जीवनदान दिल्याची कथा ऐकवली. 




श्रीमद भागवत कथेमध्ये बाल कथावाचक पं श्रीकृष्ण महाराज दुबे  यांचे संस्कृत भाषा वर प्रभुत्व मिळवले असून संगीतमय कथा सांगतांना सजीव देखावे उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे कथा ऐकतांना वेगळाच आनंद श्रोता व भाविकांना येत आहे. 



  

म्हैसपूर येथील शिव महापुराण कथा आयोजक रुपेश चौरसिया आणि विजय दुबे परिवाराने पूजा करून शिव महा पुराण कथेला शिव शंकराच्या जयकाराने प्रारंभ करण्यात आला.   यावेळी लाखोंच्या संख्येने महिला भविकांसह भाविक उपस्थित होते.  याच भविकांच्या उपस्थिती मध्ये वृन्दावन निवासी बाल कथावचक श्रीकृष्ण महाराज दुबे यांच्या वाणीतून दुपारी साडे तीन ते साडे सहा यावेळेत श्रीमत भागवत कथा प्रारंभ झाली आहे.  कथेच्या दुसऱ्या दिवशी देवाच्या विविध अवतारांची माहिती देतांना ईश्वरांचा अंश सगळीकडे असतांना भक्तीने पाहण्यासाठी शक्ती निर्माण करण्याची गरज असल्याचे श्रीकृष्ण महाराज दुबे यांनी सांगितले.




टिप्पण्या