spirituality-shiv-mahapuran-katha: शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच; 'हरी-हर' साक्षात्काराने संत नरहरी यांचा जीवनमार्ग विठ्ठलमय झाला - पंडित प्रदीप मिश्रा

श्री स्वामी समर्थ शिव महापुराण कथेला अकोल्यात प्रारंभ 






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. एकदा विठ्ठल (हरी) आणि शिव (हर) एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला, अशी कथा सांगुन पंडित प्रदीप मिश्रा यांनी अकोल्यात शिव महापुराण कथा सांगण्यास सुरूवात केली.



संत नरहरी सोनार केवळ शिव भक्त होते. त्यामुळे इतर देवांचे दर्शन घ्यायला कधीच तयार होत नव्हते. मात्र नरहरी सोनाराच्या डोळ्यांना पट्टी बांधल्यानंतर शिवदर्शन होत होते. तर उघड्या डोळ्यांनी पांडुरंग दिसत होते, असे दोन ते वेळा घडल्यानंतर डोळे बंद असतांनाच एकाच वेळी भगवान शिव शंकर आणि पांडूरंग विठ्ठल दर्शन झाल्याचा साक्षात्कार झाला असल्याची पांडुरंगाच्या कमरेच्या सोन्याचा पट्टा कधी लहान तर कधी  मोठा होत असल्याची कथा सांगत पांडुरंग हा शिव आहे आणि शिव हेच पांडुरंग असल्याचे उदाहरण देऊन कथेला प्रारंभ केला. 





अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे आज 5 मे  पासून 11 मे पर्यंत श्री स्वामी समर्थ  शिव महापुराण  आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकित कथावाचक पं प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून सुरू आहे. आज सकाळी 8  वाजता  म्हैसपूर येथील महापुराण आयोजक  रुपेश चौरसिया आणि विजय दुबे परिवाराने पूजा करून शिव महापुराण कथेला शिव शंकराच्या जयकाराने प्रारंभ करण्यात आला.   



सविस्तर कथा सांगताना पंडितजी म्हणाले की, पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस खुप प्रसिद्ध होती. कलेच्या जोरावर पंढरपुरात त्यांनी व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक कट्टर शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत होते. नित्य नेमाने पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची श्रद्धा नव्हती. एकदा एका विठ्ठलभक्त सावकारासाठी त्यांनी सोन्याची साखळी बनवली. ही सोन साखळी सावकाराने विट्ठल मूर्ती साठी बनविली होती. सावकाराने मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती, म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात विट्ठल मूर्तीच्या गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच.  शेवटी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर संत नरहरी सोनार विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगला म्हणाले, देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ।। नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला, असे पंडित मिश्रा यांनी सांगितले.


कथेच्या पहिल्या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.  याच भविकांच्या उपस्थितीत अकोलातील मूळनिवासी बाल कथावचक श्रीकृष्ण महाराज दुबे  यांच्या वाणीतून दुपारी साडे तीन ते साडे सहा यावेळेत श्रीमद भागवत कथा प्रारंभ झाली आहे. 



प्रशासकीय विभागाचे लक्ष

आज अकोला  जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे,उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनील पाटील यांच्या सह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी  ठाण मांडून होते. येथील परिस्थिती वर लक्ष ठेवून होते.



आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक सज्ज 



म्हैसपुर फाटा पातुर रोड येथे शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे कार्यकामाची गर्दी नियंत्रण व आपात्कालिन स्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे तसेच उपविभागीय अधिकारी शरद जावळे व तहसीलदार सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक सज्ज केले आहेत. या ठिकाणी नियंत्रण व मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  पथकामध्ये मंडळ अधिकारी नंदिकशोर माहोरे तलाठी सुनिल कल्ले, हरीहर निमकंडे , महेंद्र कदम, संत गाडगेबाबा आपत्कालिन पथकाचे दीपक सदाफळे सुरज ठाकुर, ऋषिकेश राखोडे, आकाश बगाडे, धिरज राउत, कुरणखेड येथील वंदे मातरम आपत्कालिन शोध व बचाव पथक उमेश आटोटे, गौतम मोहोड, मनिष मेश्राम, समाधान आटोटे, सिध्दार्थ सुरवाडे, राजकुमार जामनिक धर्मशिल मोहोड, सचिन मोहोड इत्यादी सदस्य बचाव साहित्यासह उपस्थित आहेत.









टिप्पण्या