- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
spirituality-shiv-mahapuran-katha: पंडित प्रदीप मिश्रा यांचं अकोल्यात आगमन; रेल्वे स्थानकावर पुष्पवृष्टीने स्वागत, देशभरातून शिवभक्त पोहचले म्हैसपुरला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : आंतरराष्ट्रीय कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे 5 ते 11 मे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आजोयन केले आहे. आज अकोला रेल्वे स्थानकावर पंडित प्रदीप मिश्रा यांचं आगमन झालंय पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने भक्त उपस्थित होते.
या कथेसाठी 40 एकरच्या जागेवर कथेसाठी मंडप उभारण्यात आलं असून 160 एकर जागेवर भाविकांच्या राहण्याची आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. राज्य व शेजारील राज्यातून येणाऱ्या भाविकांची 2 ठिकाणी स्वतंत्र प्रत्येकी 50 एकर जागेत पार्किंग सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. काही संघटनांनी पंडित मिश्रा यांना विरोध करत ही कथा उधळून टाकण्याचा इशारा सुद्धा दिला.
आज हजारो महिलांच्या उपस्थितीत निघाली कलश यात्रा
जिल्ह्यातील म्हैसपूर येथे पं प्रदीप महाराज मिश्रा यांच्या वाणीतून सकाळी 8 ते 11 यावेळेत महा शिवपूराण कथा तर जिल्ह्यातील निवासी विजय दुबे यांचे सुपुत्र श्रीकृष्ण महाराज यांच्या जीवनातील पहिली कथा लाखों भक्तांच्या उपस्थिती मध्ये श्रीमद भागवत कथा म्हैसपूर येथे 5 मे ते 11 मे पर्यंत संध्याकाळी 3 वाजून 30 मिनिरंपासून 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत या वेळेत सादर होत आहे. महोत्सवाची सुरुवात आज हजारो महिलांच्या उपस्थिती मध्ये कलश यात्राने झाली असून, अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे पं प्रदीप महाराज यांचे श्री स्वामी समर्थ श्री शिव महापुराण महाकथा आयोजित केली आहे. यासाठी आज दुपारी पं प्रदीप महाराज हे आयोजक रुपेश चौरसिया यांच्या निवासस्थानी पोहचले. यावेळी रेल्वे स्टेशन पासून रुपेश चौरसिया यांच्या निवासस्थानी पोहचेपर्यंत लोकांनी फुलांचा वर्षाव करीत त्यांचे स्वागत केले. आयोजक रुपेश चौरसिया यांच्या निवासस्थानी स्वागत स्वीकारून महाराजांचा ताफा पोलीस संरक्षणात म्हैसपूरकडे रवाना झाला.
देशभरातून लाखो भाविक अकोल्यातील म्हैसपूर येथे दाखल होत आहेत. आयोजक रुपेश उर्फ बंटी चौरसिया आणि विजय दुबे यांच्या द्वारे आयोजित कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक भक्तांचे आगमन होत असून, त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जात आहे. महाकथा ऐकण्यासाठी येत असलेल्या भक्तांच्या सेवेसाठी स्थानिक पिंजर येथील दीपक सदाफळे यांचे आपत्कालीन पथक रुग्णवाहिकेसह पोहचले असून सकाळपर्यंत देशभरातील लाखो भक्त दाखल होत आहेत.
पं प्रदीप मिश्रा यांचे म्हैसपूर येथे संध्याकाळी आगमन
या कथेचे मुख्य कथा वाचक पं प्रदीप मिश्रा यांचे आज 4 मे रोजी अकोल्यातील म्हैसपूर येथे संध्याकाळी आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अकोलाकर भक्त सज्ज होते. लाखो भाविकांच्या सेवेसाठी 50 एकर जागेत 2 ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे तर त्याच शेजारी भाविकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच देशभरातील धार्मिक साहित्य खरेदीसाठी विविध दुकाने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
४ मे रोजी सकाळी म्हैसपूर येथे कथा कार्यक्रम स्थळी हजारो महिलांच्या कलश यात्रेने प्रारंभ झाला आहे.
महाकथेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, आज हजारो महिलांनी कलश पूजनाने कथा कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे. आज पासूनच व्यासपीठ आणि सेवेकरी सज्ज असून भाविकांच्या सेवेसाठी विद्यूत पुरवठा, रस्ते, शौचालये,आरोग्य व्यवस्था आणि आपत्कालीन पथके तयार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या 12 बसेसची व्यवस्था
अरविंद पिसोळे बस स्थानक प्रमुख अकोला आगर क्र.2 यांच्या सहकार्याने शिव महापुराण कथा मध्ये येणारे भक्ता करीता 12 बसेसची व्यवस्था करण्याचे पत्र आयोजकांना आले असून या बसेस वाशिम बायपास वरून थेट कथा स्थळी जाणार आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा