riots-in-the-old-city-akola crime: जुने शहरात दंगा; पोलीस बंदोबस्त तैनात, नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये - आमदार सावरकर यांचे आवाहन





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अती संवेदनशील जुने शहर सोनटक्के प्लॉट किल्ला चौक परिसरात रात्री साडे अकरा बारा वाजताच्या सुमारास दंगल सदृश परिस्थित निर्माण झाली असून, दोन गटातील लोकांनी एकमेकावर दगडफेक केली. या दंगा मागचे कारण अद्याप समोर आले नाही.  परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, घरात दडून बसले आहेत. 




सोनटक्के प्लॉट कडील भागातून दगडफेकला सुरवात होवुन हरिहर पेठ कडे दंगेखोर पळत सुटले. राजेश्वर सेतू कडे काही नागरिक जीव मुठीत घेवून पळाले, असल्याचे नागरिकांनी सांगितले.






पोलीसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून, परिस्थीती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी भयभीत न होता संयम ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी पोहचले आहेत.


अमरावती पोलीस महानिरिक्षक उद्या अकोल्यात येणार आहे.पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी अकोला जिल्ह्याचा आढावा घेवून ताबडतोब सकाळी सहा वाजेपर्यंत कळविण्याचे सांगितले आहे.


उप मुख्यमंत्री तथा अकोला जिल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी शांतता राहण्याची आवाहन केले आहे. पोलीस प्रशासन ठेवून आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस घटनेवर लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात पोलीस दलाची सहस्त्र तुकडी अमरावती वरून रवाना झाली आहे.



नागरिकांनी अफवा वर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. असामाजिक तत्वावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार आहे.


कायदा आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कलम 144 लागू करण्याचा आदेश देवून अमलबजावणी केली आहे.




टिप्पण्या