political-news-akola-city-ncp: शरद पवार साहेबांनी दिल्लीत बसून राजकारण बघावे - पापाचंद्र पवार यांचे मत






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रवादी काँगेसचे सुप्रीमो शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांनी देशाच्या राजकारणात लक्ष घालावे.  दिल्लीत बसून त्यांनी देशाच्या राजकारणासह महाराष्ट्र राज्याचे राजकारण बघावे, आपल्या पदाचा परत राजीनामा देवून नव्या पिढीला कामे करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला महानगर संघटन सचिव पापाचंद्र पवार यांनी व्यक्त केले. हे माझे वयक्तिक मत असल्याची पुष्टी देखील त्यांनी यावेळी जोडली.




राष्ट्रवादी काँगेस पक्ष कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 



पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार 'साहेब आपण चुकलो' या ब्रीदवाक्याखाली शरद पवार यांनी दिल्लीत बसून देशाच्या राजकारणासह महाराष्ट्र राज्याचे राजकारण बघावे, असे सुचविले. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आपला पक्ष विरोधी पक्ष म्हणून असल्यामुळे महाराष्ट्रामधील संपूर्ण नेत्यांना कामे करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे म्हणाले. 



विरोधकांना राष्ट्रवादी पक्ष व पवार कुटुंब भारी पडल्यामुळे विरोधी पक्ष उलट प्रचार करीत राहतात. त्यामुळे पक्षांमधील कार्यकर्त्यांना आपली कार्य करू द्यावे. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री हवा आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. 



आपण (शरद पवार) फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता दिल्लीत बसून मार्गदर्शन करावे. नजर ठेवावी. नेता म्हणून मार्गदर्शन करत राहावे, असेही देखील पापाचंद्र पवार यांनी सुचविले. शरद पवार यांचे आता वय झाले आहे. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. पाच हजार किलो मीटरचे प्रवास आरोग्यास योग्य नाही. त्यांनी एका ठिकाणी बसून राजकरणात लक्ष घालावे, मार्गदर्शन करावे.त्यांच्या मार्गदर्शनाची पक्षालाच नव्हेतर देशाला गरज आहे. भावनात्मक राजकरण चालत नाही. हे मी साहेबांच्या काळजी पोटी बोलत आहे,असे पापाचंद्र पवार म्हणाले.



राष्ट्रवादी काँगेस पक्षमध्ये वरच्या ते खालच्या पातळीवर गट आहेत, हे मान्य आहे. हे सर्वश्रुत आहे. जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि प्रत्येक समाजाचा गट आहे. पण गटाचे राजकारण आणी गटा गटात येथे राजकरण चालत नाही. सर्व एकोप्याने राहतात. वागतात. स्थानिक पातळीवर देखील पक्षश्रेष्ठीनच्या शब्दाबाहेर कोणीच जात नाहीत,असे स्पष्ट शब्दात पापाचंद्र पवार यांनी सांगितले. 



नेमके काय म्हणाले पापाचंद्र पवार


"साहेब आपण चुकलो" 

1. लोहा गरम होता आपण हातोडा मारला नाही ही वेळ योग्य होती. पक्ष आणखीन मजबूत होत होता मजबूत होत होता.

2.आपण पहिल्या वेळेस युती केली, तेथे आपण चुकला, साहेब.

3.दुसऱ्या वेळेस युती केली होती, युतीमध्ये असं ठरलं होतं की ज्याचा जास्त आमदार होतील त्यांचा मुख्यमंत्री होतील असं ठराव केलेला होता, तरीपण मुख्यमंत्री केला नाही. महाराष्ट्राची जनतेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पाहिजे होता.

4.आपण महाराष्ट्र का फिरतात?

आपण भारत देशाचे नेता आहे. आपण महाराष्ट्रामध्ये विरोधात आहे. विरोधी पक्ष नेता आपला असल्यामुळे यांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये फिरू द्या. फक्त आपण नजर ठेवावी.

5.अजितदादा बीजेपी मध्ये जाणार नाही, विरोधी पक्ष व आपला काही नेता दिशाभूल करत आहे. विरोधकांना फक्त राष्ट्रवादी व पवार कुटुंब भारी पडल्यामुळे ते उलट प्रचार करीत राहतात. आपल्याला मिस गाईड करत राहतात.

6.आपण भाकर फिरवणार होता, पण आता आमच्या जनतेने काय खायचं? 7. आपण परत विचार करण्यात यावा कारण की आता आपण दिल्लीत बसून मार्गदर्शन करावे, नेता म्हणून मार्गदर्शन करण्यात यावे, ही अपेक्षा.



या अपेक्षा घेवून येत्या काही दिवसात शरद पवार यांच्याशी भेट घेणार असल्याचे यावेळी पापाचंद्र पवार यांनी सांगितले.


या पत्रकार परिषदेला संघटन सचिव  ॲड. संदीप तायडे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष रमजान शेख, ग्राहक संरक्षण संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश खंडेलवाल आदींची उपस्थिती होती.





टिप्पण्या