fire in akola: अकोला शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग; लाखोंची खेळणी जळून खाक





भारतीय अलंकार 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहरातील मध्यवर्ती भागातील बैदपुरा परिसरातील एका प्लास्टिक खेळणीच्या गोदमाला सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.



ही आग आटोक्यात आणण्यासाठी पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे. या भागातील अरुंद रस्तेमुळे आग विझविण्यास अडचण निर्माण होत आहे. रस्ते अरुंद असल्याने अग्निशमनच्या गाडीला येथे प्रवेश करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. 





आगीने रुद्रावतार घेतल्याने दक्षता म्हणून खुले नाट्यगृह ते फतेह चौक वाहतुकीसाठी रस्ता  बंद करण्यात आला आहे. 





ही आग आटोक्यात आणण्यासाठी अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे घटना स्थळी उपस्थित आहे. घुगे यांनी   स्वतः घटनास्थळाजवळील घरांमधून गॅस सिलेंडर बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा  प्राथमिक अंदाज आहे. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली आहे. 





सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

टिप्पण्या