encroachment: मनपाव्‍दारा कॅनाल नाल्‍यावरील अतिक्रमणाचा सफाया; पोलीस बंदोबस्‍तात कारवाई




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  शहरात अनधिकृत बांधकामांमुळे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. पावसाळा जवळ आल्याने महापालिका द्वारा नाले सफाईला सुरुवात झाली आहे. मात्र शहरातील अनेक नाल्यांवर अनधिकृत बांधकाम असल्याने नाले सफाईला अडथळे येत आहे. आज महापालिकाद्वारे शिवसेना वसाहत ते हायवे पर्यंत नाल्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सुमारे 80 अतिक्रमण धारकांना महापालिका तर्फे नोटिसेस बजावण्यात आल्या होत्या. यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान एका व्यक्तीने अडथळा निर्माण केला असता त्याच्या विरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली.







मनपाव्‍दारा कॅनाल नाल्‍यावरील अतिक्रमणे काढण्‍यात आले.   


आज 22 मे 2023 रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये व उपस्थितीत तसेच जिल्‍हाधिकारी नीमा अरोरा आणि जिल्‍हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्‍या उपस्थितीत मनपा अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांव्‍दारे नाले सफाईच्‍या कामात आणि विकासात्‍मक कामात अडचण निर्माण करणारे शिवसेना वसाहत, गुडवाले प्‍लाट, हमजा प्‍लॉट, मोळके वाडी, अहमद कॉलनी बायपास पर्यंतच्‍या कॅनाल नाल्‍यावरील अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्‍तात निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.




          

या कारवाईत चारही झोन कार्यालयाचे सहा. आयुक्‍त विजय पारतवार, विठ्ठल देवकते, दिलीप जाधव, देविदास निकाळजे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, सहा.नगर रचनाकार राजेंद्र टापरे, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, मुख्‍य अग्निशमन अधिकारी हारूण मनियार, मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अनुप चौधरी यांचेसह पश्चिम झोन कार्यालयाचे, अतिक्रमण विभागाचे, स्‍वच्‍छता विभागाचे, विद्युत विभागाचे, अग्निशमन विभागाचे तसेच पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती.




                                                                


टिप्पण्या