- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
crime-news-thane-court-bail: चांगल्या प्रतीचे सोने कमी किंमतीत खरेदीचे आमिष, एका डॉक्टरने केली दुसऱ्या डॉक्टरची फसवणुक,आरोपीस जामीन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*ठाणे जिल्हयात घडली घटना: दोन आरोपीस जामीन मंजूर
*फिर्यादी व मुख्य आरोपी अकोल्याचे
*अकोल्याच्या वैद्यकिय क्षेत्राला काळीमा
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: चांगल्या प्रतीचे सोने कमी किंमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून अकोल्यातील एका नामवंत डॉक्टरने दुसऱ्या प्रख्यात डॉक्टरची फसवणुक केली आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टरने वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरूध्द तक्रार केली. यातील मुख्य दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. यानंतर न्यायलयाने दोन्ही आरोपींची पाच दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली होती.या प्रकरणी आता दोन्ही आरोपींना न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग तिसरे (ठाणे )न्यायालयाने अटी व शर्ती सह जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणी न्यायालयात आरोपींची बाजू ॲड. पप्पू मोरवाल यांनी मांडली.
या संपूर्ण प्रकरणात मात्र अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्या गेली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी डॉ.पार्थसार्थी शुक्ल (वय ५२ रा. गंगाधर प्लॉट अकोला) यांचे परीचयाचे डॉक्टर कृष्णमुरारी शर्मा (मुख्य आरोपी) याने फिर्यादीला 15 ते 20 दिवसांपुर्वी तुम्हाला सोने खरेदी करावयाचे असल्यास मी तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोने कमी किंमतीत खरेदी करून देवु शकतो व तुम्हाला त्याची पावती देखील मिळेल, असे सांगितले. त्यासाठी आपण बुधवारी मुंबई येथे जावु असे सांगितल्याने 26 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01.15 वाजताचे सुमारास आरोपी डॉ. कृष्ण मुरारी शर्मा (वय अंदाजे 45 रा. रामदास पेठ अकोला) व डॉ. अक्षय ठाकूर (वय 34 रा. पेण रायगड) सह आरोपी रोहीत नावाच्या इसमाने फिर्यादी डॉ. शुक्ल यांना कॅश आणली आहे का ? असे विचारल्याने फिर्यादीने आरोपी रोहीत यास कॅश चेक करून दाखविली. बॅगेत 500 रूपये दराच्या 100 नोटा असे 50 बंडल होते. त्यानंतर ती पैशाची बॅग फिर्यादी बंद करीत असताना आरोपी रोहीतने ही बॅग फिर्यादीकडुन जबरीने खेचुन घेवुन न सांगता पळुन गेला. फिर्यादीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी रोहीत सोबत असलेला लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम फिर्यादीला म्हणाला की, मी आहे ना तुमच्या सोबत असे बोलून त्याने त्याचे शर्ट वर करून फिर्यादीला त्याचे पोटाला बांधलेला सोन्याचे बिस्किटचा बेल्ट दाखविला व म्हणाला की तुम्ही सोन्यासाठी आला आहे ना काळजी करू नका, असे बोलला. त्यानंतर फिर्यादीने हे सोने खरे आहे का, याबाबत खात्री करण्याकरीता फिर्यादी व दोन मुख्य आरोपी आणि सह आरोपी पायी चालत गाडी लावलेल्या ठिकाणी गेले असताना पुढे काही अंतर गेल्यावर मुख्य आरोपी डॉ. शर्मा याने फिर्यादीला सांगितले की, पळून गेलेला व्यक्ती आणि अन्य एक यास पोलीसांनी सी. एम. एस. व्हॅनमध्ये नेले आहे. तेव्हा फिर्यादीची खात्री झाली की, मुख्य दोन आरोपी आणि सह आरोपी यांनी आपसात संगनमत करून फिर्यादीला सोने न देता फिर्यादीची फसवणुक करून त्यातील आरोपी रोहीत याने फिर्यादी यांचेकडील 25,00,000 रोख रक्कम असलेली बॅग फिर्यादीकडुन जबरीने खेचुन घेवुन न सांगता पळुन गेला. यांनतर डॉ. शुक्ल यांनी डॉ शर्मा, डॉ ठाकुर यांच्यासह रोहित, एक अनोळखी इसम, सम, सावलिया, माथूर, हारुन सागवेकर (सायन मुंबई) यांच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ही घटना 26 एप्रिल रोजी रघुनाथ नगर ठाणे येथे घडली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बी. एस निकुंभ करीत आहेत. मुख्य दोन आरोपी डॉक्टरांना पोलीसांनी 28 एप्रिल रोजी अटक केल्यानंतर न्यायालया समोर हजर केले होते. यानंतर दोन्हीं आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
गुन्हयातील अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात गुन्हयामध्ये पाहीजे (वॉन्टेड) असलेले आरोपी सॅम, सावलिया, माथुर यांचा देखील सहभाग असल्याची कबुली दिली. यातील पाहीजे आरोपी माथुर याचा मोबाइल क्रमांकाचा सीडीआर प्राप्त झाला असुन त्यात पाहीजे असलेला आरोपी माथुर याचे लोकेशन गुन्हयाचे वेळी घटनास्थळी असल्याचे दिसुन आले आहे.
गुन्हयातील फिर्यादी यांच्याकडुन जबरीने चोरून नेलेल्या रक्कमेबाबत तसेच पाहीजे आरोपी बाबत अटक असलेले आरोपी यांच्याकडे तपास केला असता ते तपासात कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसुन उडवाउडवीची उत्तरे दिली.
गुन्हयातील तपासात गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे संशयित मो.नं. ८७६७५७८५८७ याचा सीडीआर प्राप्त करुन त्याचे गुन्हयाचे वेळीचे लोकेशन तपासुन पाहीले असता मोबाईल धारकाचे लोकेशन गुन्हयाचे ठिकाणी येत असल्याने मोबाईल धारक हारुण महादेव सागवेकर, (रा. प्रतिक्षानगर, सायन, मुंबई) याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचा शोध सुरू आहे. इतर पाहिजे आरोपी रोहीत नावाचा इसम, लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम, सॅम, सावलिया, माथुर यांच्या बाबत तसेच त्यांच्या सध्याच्या ठावठिकाण्याबाबत शोध सुरू आहे.
गुन्हयाच्या घटनास्थळी येण्याकरीता व गुन्हा केल्यानंतर पळुन जाण्याकरीता आरोपी यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला आहे अगर कसे ? याबाबत तपास सुरू आहे. गुन्हयातील अटक आरोपीत व पाहिजे आरोपीत यांचे आणखी कोणी साथीदार आहेत अगर कसे ? गुन्हयातील अटक आरोपी व पाहिजे असलेले आरोपी यांनी अशा प्रकारची फसवणुक करून जबरी चोरीचे आणखी गुन्हे केले असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा