Akola riots: अकोला दंगल: शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त; रस्ते निर्मनुष्य, चौक सूनसान, जनजीवन विस्कळित






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अती संवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा जुना शहरात शनिवारी रात्री दोन गटात राडा झाला. सोशल मीडिया इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने ही दंगल उसळली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाप्रशासनाने रात्रीच कलम 144 लागू केली. ज्या ठिकाणी दंगल जाळपोळ झाली त्या  हरिहर पेठ भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. 


या दंगलीची झळ संपुर्ण अकोला जिल्ह्याला पोहचली आहे. रविवारी सकाळ पासून शहरातील मुख्य गांधी मार्ग, टिळक मार्ग निर्मनुष्य झाला आहे. एरव्ही दिवस रात्र गर्दीने फुललेला हा मार्ग आज सूनसान झाला आहे. सिटी कोतवाली चौक शांत आहे. 




शहरात ऑटो रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.फळ भाजी बाजार बंद आहे. जुने शहर, जैन मंदीर, शिवाजी नगर येथील भाजी बाजार संपुर्ण बंद आहे. दंगलीच्या भितीने जनता बाजारातही लोक फिरकले नाहीत. किराणा बाजार, रविवारी भरणारा चोर बाजार, गांधी रोड चौपाटी बंद असल्याने गांधी रोड ओळखणे कठीण झाले आहे. 




अशी घडली घटना 

13 मे 2023 रोजी रात्रीच्या 22.30 वाजता अचानक मुस्लीम जमाव पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे मोबाईलवर "प्रेशीत मुहमंद यांचे शान मध्ये गुस्ताकी केली"  हया कारणावरुन जमाव जमला होता. त्याच प्रकारे जमाव हा पोलिस स्टेशन जुने शहर हददीतुन रामदास पेठ कडे दुसरा जमाव निघाला. तो अचानक दगडफेक करु लागला.  त्या जमावाने सार्वजनिक शांतता भंग केली. आणी सार्वजनिक मालमत्तेची जाळ पोळ करुन नुकसान केले. मोठमोठयानी नारेबाजी केली. त्यामुळे जमावाचे अशा वर्तनामुळे सर्व सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले. जमाव बेकाबु होत असल्याने त्याला तात्काळ शांत करणे आवश्यक होते. त्यास प्रतिबंध करणेसाठी अकोला शहरातील कोतवाली, रामदासपेठ, जुने शहर, डाबकी रोड हया पो.स्टे हददीत CRPC 144 कलम लागु करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कडे केली. यानंतर लगेच जिल्हाधिकारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चारही पोलीस स्टेशन हद्दीत कलम 144 लागू करण्याचा आदेश दिला.



144 कलम लागू 




शनिवारी रात्री अचानक एका गटाच्या जामावाने पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे जमून दगडफेकीस सुरवात केली. मोबाईलवर आक्षेपार्ह संदेश फिरल्यामुळे जमावाने दगडफेक करुन शांतता भंग केली. सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करुन नुकसान केले. मोठ्यामोठ्यांनी नारेबाजी केली. त्यामुळे जमावाचे अशा वर्तनामुळे सर्व सामान्य जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले. जमाव बेकाबू होत असल्याने त्याला तात्काळ शांत करणे आवश्यक असल्याने त्यास प्रतिबंध करणेसाठी अकोला शहरातील कोतवाली, रामदासपेठ, जुनेशहर, डाबकी रोड या पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू होणे आवश्यक होते. या घटनेमुळे चारही पोलीस स्टेशन हदीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दंगल नियंत्रणात आणणेकरीता तातडीने संचारबंदी लागू करून निर्बंध घालणे आवश्यक होते.

पोलीस अधीक्षक, अकोला यांचेशी चर्चा केल्यानंतर नीमा अरोरा, भा.प्र.से जिल्हादंडाधिकारी अकोला यांनी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून  रामदास पेठ, सिटी कोतवाली, डाबकी रोड व जुनेशहर पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये संचारबंदी लागू केली.

या आदेशानुसार संचारबंदी लागू असतांना चारही पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये कोणासही मुक्त संचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला. नियमाचे उल्लघन केल्याचे निदर्शनास आल्यास त्या इसमाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले.

प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने रात्री जाहीर केले. हा आदेश 14 मे 2023 रोजी मध्यरात्रीपासून पुढील आदेशा पर्यंत लागू राहणार आहे. 




याप्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते. रात्री जवळ्पास 37 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय अमरावती, वाशिम व बुलडाणा मधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.


पोलीस अधीक्षक यांचे आवाहन 

सोशल मीडिया वर कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील अशी चुकीची पोस्ट शेयर करू नका आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नका,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.



आमदार गोवर्धन शर्मा यांची भेट

आज दुपारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दंगलग्रस्त भागात भेट देवून, नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी निमा अरोरा काल रात्री पासून घटनास्थळी ठाण मांडून बसले असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.









टिप्पण्या