Akola riots: अकोला दंगल: 64 आरोपींना 19 पर्यंत पीसीआर; दोघांची कारागृहात रवानगी

 



भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहरात घडलेल्या दंगल नंतर पोलीसांनी घटनेत सहभागी आरोपींची धरपकड करण्यास सुरूवात केली होती. पोलीसांनी या घटनेत सहभागी  66 आरोपींना ताब्यात घेवून सोमवारी न्यायालय समक्ष हजर केले.  

दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्या नंतर न्यायाधीशांनी 64 आरोपीना 19 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर दोन आरोपींना न्यायिक कोठडी सुनावण्यात येवून करागृहात रवानगी करण्यात आली. प्रकरणाची सुनावणी रात्री 9:30 वाजेपर्यंत न्यायालयात चालली.






ती घटना शॉर्ट सर्किटमुळे; अफवांवर विश्वास ठेवू नये - मोनिका राऊत 





अकोला: जुने शहरातील शिवसेना वसाहत परिसरात एका घराला 15 मे च्या रात्री आग लागली. आगीत एका महिलेचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच संबंधित विभागासह पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे कारण समोर आले आहे.





या घटने संदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी केले आहे. सध्या अकोला शहरात शांतता असून दंगल परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे.





सोमवार 15 मे रोजी उशीरा रात्री जुने शहर स्थित गुडवाले प्लॉट आणि शिवसेना वसाहत मधील कॅनाल जवळील अकबर खान यांच्या घराला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये त्यांच्या 65 वर्षीय आईचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे समोर आले आहे. कोणीही याबाबत अफवा पसरवू नये. अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासन द्वारा एएसपी मोनिका राऊत यांनी दिले आहेत. 



टिप्पण्या