akola-crime-gold-chain-theft: श्रीशिव महापुराण कथा स्थळी भक्तांची सोनसाखळी चोरी करणाऱ्या महिला टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या; जेवणाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा

जेवणाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी केला हात साफ 








भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: म्हैसपुर येथे सुरू असलेल्या श्रीशिव महापुराण कथेमध्ये गर्दीचा फायदा घेत महिला भक्तांची सोनसाखळी चोरी करणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 10 महीला आरोपींना अटक केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या  या महिला नागपूर , वर्धा , राजस्थान आणि मध्य प्रदेशातील असून त्यांच्या जवळून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 





स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडुन पोलिस स्टेशन बार्शिटाकळी हददीतील श्री शिव महापुराण कथे मध्ये महीला भक्तांची सोनसाखळी चोरी करणारी बाहेर राज्यातील तसेच अंतरराज्यातील महीला आरोपीचा पर्दाफाश करून 10 महीला आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिला या नागपुर, वर्धा (महाराष्ट्र), भरतपूर (राजस्थान) इंदौर (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहेत.


अकोला जिल्हयात 5 मे पासुन म्हैसपुर येथे आयोजित शिव महापुराण कथे मध्ये महीला भक्तांचे सोनसाखळी चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या. पोलीस अधिक्षक सदीप घुगे  व अपर पोलीस अधिक्षिक मोनिका राउत,उपविभागीय पोलीस अधीकारी संतोष राउत , विभाग मुर्तीजापुर अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संतोष महल्ले व स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व कर्मचारी यांना सोनसाखळी चोरी गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार 6 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पथकाकडुन शिवपुराण कथा सपल्यानंतर जेवण करणेसाठी जाणारा महीलांची गर्दीचा फायदा घेवुन महीलांचे गळयातून सोनसाखळी चोरी करतांना राज्यातील व बाहेर राज्यातील एकुण 10 महीलाना ताब्यात घेण्यात आले. 



यांना केली अटक 



आशा हरीलाल धोबी रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर , मुंज्जुदेवी राजु धोबी रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर, चंदा सोनु धोबी रा. रेल्वे स्टेशन जवळ नागपुर,  अनिता सुरेश धोबी रा रेल्वे स्टेशन जवळ नागपुर,  कमलेश सुरजलाल बावरीया रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान , शशी रीकु बावरीया रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान, कश्मीरा हीरालाल बावरीया रा.रंतीत नगर भरतपुर राज्य राजस्थान, प्रीया संदीप उन्हाळे रा सावंगी मेघे जि वर्धा, सुरया राप्रसाद लोंडे रा सावंगी मेघे जि वर्धा , लता किशन सापते रा भीमनगर इंदौर मध्यप्रदेश अशी या महिलांची नावे आहेत. 




महीला पोलीस अमलदार यांच्या मदतीने संशयित महिलांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीमध्ये तीन मनी डोरलेचे जोड, दोन मीनी मंगळसुत्र वजन अंदाजे 32 ग्रॅम कीमत अंदाजे 1 ,82,000 रुपयेचा मुददेमाल प्राप्त झाला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे देण्यात आले. 




ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती मोनिका राउत , उपविपोअ संतोष राउत विभाग मुर्तीजापुर यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. संतोष महल्ले, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि गोपाल ढोले, सपोनी महेश गावंडे, पोउपनि गोपीलाल मावळे, पोलीस अंमलदार फीरोज खान, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, मो. अमिर, आकाश मानकर, धिरज वानखडे, चालक नफीज यांनी केली.




पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रार 

कथा स्थळ 


बार्शीटाकळी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या ग्राम म्हैसपूर या गावात 5 मे ते 11 मे या कालावधीत महाशिवपुराण कथाचे आयोजन केले आहे. या कार्यकमात प्रचंड संख्येने विशेष करून महिला भक्तांची गर्दी होत आहे. महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात, त्याचा फायदा घेत या कार्यक्रमात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. 6 मे रोजी बार्शीटाकळी ठाण्यामध्ये विविध ठिकाणच्या राहणाऱ्यांनी फिर्याद दिली. तिघांच्या फिर्यादीमध्ये एकूण दोन लाख 28 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे नमूद आहे.



फिर्यादी अश्विनी अमित जुनारे वय 29 रा. शास्त्री नगर अकोला यांनी आपले सोन्याचे एकुण एक लाख वीस हजारांचे दागिने लंपास झाल्यांची तक्रार दाखल केली आहे. तसेच दुसरी फिर्याद अर्चना दिगांबर देशमुख रा. नांदुरा जिल्हा बुलडाणा यांनी दाखल केली असुन त्यांचे 18 हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे म्हंटले आहे. मानसी अमीत मुरारका रा. न्यु राधाकिसन प्लाट अकोला यांनी त्यांची 90 हजारांची मिनी पोत व अन्य सोन्यांचे दागिने लंपास झाल्याची फिर्याद दिली. तिघांचे एकुण दोन लाखा 28 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच एकुण 12 संशयीत महिलांना ताब्यात घेऊन तपास सुरु केला. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची कसून चौकशी केली असता त्यातील 10 महीला दोषी आढलल्या आढळल्या. या दहा आरोपींवर रविवारी 7 मे रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 



पोलिसांचे आवाहन 

शिव महा पुराण कथा ऐकण्यास लाखोच्या संख्येने भक्त येतं आहेत.भक्तांनी गर्दीच्या ठिकाणी असताना सतर्क रहावे.  संशयित व्यक्त दिसल्यास त्वरित कार्यक्रम स्थळी असलेल्या पोलीस सहायता केंद्रामध्ये माहिती द्यावी. तसेच महिलांनी सोन्याचे दागिने व अन्य किंमती वस्तू सांभाळून ठेवावे. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी आणूच नये. तसेच पर्स, मोबाईल, पॉकिट सांभाळून ठेवावे, असे आवाहन संजय सोळंके, पोलीस निरीक्षक, बार्शीटाकळी यांनी केले आहे.



टिप्पण्या