tushar pundkar murder case: बहुचर्चित तुषार पुंडकर हत्याकांड: न्यायलयाने दोन आरोपींचा जमानत अर्ज व एकाचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळला







भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोट: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी पो.स्टे. अकोट शहर येथील गुन्हा क.80 / 2020 कलम भादंवि 302,120-ब, 201,34 व इतर कलमानुसार अकोट येथील बहुचर्चीत तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपी अल्पेश भगवान दुधे (वय 24 वर्ष), श्याम पुरूषोत्तम नाठे (वय 22 वर्ष), दोघे राहणार अकोट ) यांनी जमानत मिळण्याकरिता केलेला अर्ज नामंजूर केला. तसेच याचं प्रकरणातील आरोपी गुंजन देवीदास चिंचोळे याने सीआरपीसीचे कलम 227 नुसार या प्रकरणातून मुक्तता करण्यासंबंधीचा अर्ज देखील नामंजूर केला आहे. तसेच ज्यांची वरील प्रमाणे जमानत अर्ज फेटाळलेत ते दोन्ही आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात आहेत.




या प्रकरणात महाराष्ट्र शासनाने ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे. व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सरकारी वकील अजित देशमुख यांनी वरील प्रकरणात अकोट सत्र न्यायालयात युक्तीवाद केला की, दिनांक 21 फेब्रुवारी 2020 चे रात्री 10 वाजताचे सुमारास अकोट शहर पो.स्टे. जवळ प्रहार संघटनेचे माजी जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र सर्व आरोपीविरूध्द सादर करण्यात आले आहेत. 




अकोट मध्ये काही वर्षांपूर्वी तेजस सेदाणी याच्या खूनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपी पवन सेदाणी याने त्याचे साथीदार अल्पेश दुधे, श्याम नाठे, गुंजन चिंचोळे तिघेही राहणार रामटेक पूरा अकोट यांच्यासोबत मिळून तुषार पुंडकर याला जीवानिशी ठार मारण्याचा कट रचला व रचलेल्या कटाप्रमाणे आरोपी अल्पेश दुधे व श्याम नाठे यांनी मोटर सायकलने घटनास्थळी पोहचून बंदुकीने तुषार पुंडकर याला जीवानिशी ठार करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर बंदुकीने गोळीबार करून त्याला जीवानिशी ठार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचा पुरावा दोषारोपपत्रामध्ये असून तसे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहेत. एकंदरीत तपासामध्ये उपलब्ध झालेला तांत्रीक पुरावा व साक्षीदारांचे बयान यावरून पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आरोपी अल्पेश दुधे, आरोपी श्याम नाठे व आरोपी गुंजन चिंचोळे यांनी मिळून तुषार पुंडकर याला जीवानिशी ठार करण्याचा कट रचला. तसेच आरोपी श्याम नाठे याने तुषार पुंडकर याच्या डोक्यात एक गोळी झाडली व त्यानंतर अल्पेश दुधे याने त्याच्या जवळ असलेल्या बंदुकीतून तुषार पुंडकरच्या पाठीवर बंदुकीच्या गोळया झाडून त्याला जीवानिशी ठार केले. त्याचप्रमाणे गुंजन चिंचोळे याने कटाची माहिती लपवून ठेवली. असा सबळ साक्षपुरावा दोषारोपपत्रामध्ये उपलब्ध आहे. आरोपींना जामीनावर सोडल्यास ते साक्षीदाराला हानी पोहचवू शकतात. वरील गुन्हयामध्ये फाशी सारखी शिक्षा असून, गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. आरोपी विरूध्द प्रकरण जलद गतीने चालविण्यास सरकार पक्ष तयार आहे. वरील दोन्ही जमानत अर्जासंबंधी व मुक्त करण्याच्या अर्जासंबंधी दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता, साक्षीदारांचे बयान व इतर कागदोपत्री पुरावे पाहता आरोपीला शिक्षा होण्याइतपत पुरावा दोषारोपपत्रामध्ये दाखल असल्याने दोन्ही आरोपींचा जमानत अर्ज खारीज करण्यात यावा व तिसऱ्या आरोपीने जो मुक्तता करण्यासंबंधीचा अर्ज केला आहे. तो देखील खारीज करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. व दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर वि. कोर्टाने वरील दोन्ही आरोपींचे जमानत अर्ज नामंजूर केलेत. व तिसऱ्या आरोपीचा मुक्तता करण्याचा अर्ज देखील नामंजूर केला आहे.

टिप्पण्या