road-accident-washim-bypass: वाशिम बायपास जवळील अपघातात बालकाचा जागीच मृत्यू: आमदार सावरकर घटनास्थळी; पोलीस विभागाला दिले निर्देश





ठळक मुद्दे 

*वाशिम बायपास चौकतील अवैध गॅरेज बंद करा 

*अकोला शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली

*आमदार सावरकर यांनी पोलीस विभागाला दिले निर्देश 





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वाशिम बायपास जवळील अहमद कॉलनीसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 10 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला.  शेख अल्फराज शेख जिगर असे मृत मुलाचे नाव असल्याचे समजते.  या घटने मुळे परिसरात रोष व्यक्त करण्यात येत आहे.




घटनेची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस ठाण्याचे अधिकारी सेवानंद वानखडे घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. 




अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचा मृतदेह बराच वेळ तेथेच पडून होता. स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून आणि बघेकरांची गर्दी कमी करण्यासाठी जुने शहर पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अद्याप अज्ञात वाहनाचा शोध लागला नसून, पुढील तपास जुने शहर पोलीस करत आहेत.



अकोला शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडली: आमदार सावरकर यांनी दिले निर्देश 



ट्राफिक व्यवस्था  व्यवस्थित करा दुर्घटना घडणार नाही याकडे लक्ष द्या अकोल्यातील वाशिम बायपास टॉवर चौक अशोक वाटिका चौक येथे कर्मचाऱ्यांची व्यवस्थित ड्युटी संदर्भात लक्ष केंद्रित करून भविष्यात असा प्रकार होणार नाही याकडे सूचना द्या असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांना करून ट्राफिक अधीक्षक रिंगणे यांना या संदर्भात सूचना द्या, असे प्रत्यक्ष भेटून दिले.





वाशिम बायपास येथे एका दुर्घटनेत एक लहान बालकाचे निधन झाले, या घटनेची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोक वेदना संवेदना व्यक्त केली. लगेच अशोक वाटिका, वाशिम नाका, लक्झरी स्टॅन्ड,  महाराजा अग्रसेन चौक ते  बस स्टॅन्ड, नेहरू पार्क या भागाकडे लक्ष केंद्रित करण्याचे सूचना ट्राफिक विभागाला देण्यात यावा व कर्मचाऱ्यांनी कर्तव्याने पालन करून ट्राफिक व्यवस्थित तसेच त्याची गती याकडे लक्ष द्यावे, यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करण्यात यावी. भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.




अवैध गॅरेज बंद करा 



वाशीम बायपास चौकाच्या आजूबाजूला अवैध रित्या सुरु असलेल्या गॅरेज वर कारवाई करून या संबंधित येत्या आठ दिवसात परिस्थिती सुधरविण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी पोलीस विभागाला दिले. यावेळी वाहतूक इंजार्ज पी. आय. किनगे यांना सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले. विक्की भिसे व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या