mahatma-jyotiba-phule-jayanti: महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त अकोला शहरात भव्य शोभायात्राचे आयोजन







भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला दि,10: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक उत्सव समिती अकोला तर्फे मंगळवार, 11 एप्रिलला भव्य शोभायात्रेचे आयोजन केले आहे.  शोभायात्रेचा आरंभ सायंकाळी 5 वाजता महाराणा प्रताप चौक येथून होणार आहे.




महाराणा प्रताप बाग सिटी कोतवाली पोलीस स्टेशन समोरून गांधी रोड, बस स्टॅन्ड ते अशोक वाटिका या मार्गावरून यात्रा निघुन रात्री दहा वाजता समारोप होईल. 




शोभा यात्रेचे विशेष आकर्षण 

महात्मा फुले यांचे वेशभूषा परिधान करून असलेले अनेक युवक,  आकर्षक रथ, बँड पथक वारकरी भजन व टाळकरी मंडळी विविध आखाडे लेझीम पारंपारिक वाद्य ढोल पथक ध्वज पथक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेले विविध देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई सह भव्य शोभायात्रा जल्लोषात निघणार आहे. 





या शोभायात्रेमध्ये अकोलेकर नागरिकानी सहपरिवार व इष्टमित्रासह सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक उत्सव समिती अकोला तर्फे माजी राज्य क्रीडा मंत्री सुधाकर गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, मा. बळीराम शिरस्कार , प्रा. डॉ .संतोष हुशे, जयंत मसने, ॲड. संतोष राहटे, प्रा. शत्रुघ्न बिडकर, आशिष ढोमणे, प्रविण वाघमारे, लक्ष्मण निखाडे, उमेश मसने, प्रविण निलखन, मनिष हिवराळे, प्रा. श्रीराम पालकर, प्रा. नितीन देऊुळकर, रामदास खंडारे, डॉ. प्रकाश वानखडे, मनोहर उगले, अक्षय नागापुरे ,बाळकृष्ण काळपांडे, राजुभाऊ वरोकार, ऋषीराज आमले, आशिष मांगुळकर, प्रा. अशोक राहटे, प्रा.अशोक भराड, अमोल कलोरे, देवेंद्र इंगळे, महेंद्र काळे, प्रा. गजेंद्र काळे, दिनेश सोळंके, राजेश जावरकर , शंकरराव गीऱ्हे,  डॉ. अशोक गाडगे, ॲड. नरेन्द्र बेलसरे, माजी महापौर अर्चना मसने, संगीता अढाऊ जी.प. अध्यक्ष, हेमा हुशे, प्रिती निलखन, गायत्री वाघमारे, कल्पना निखाडे, रजनी पालकर, वर्षा कलोरे,  दामिनी नागपुरे, कल्पना मसने,  माया इरतकार आदींनी  केले आहे.


टिप्पण्या