drink-water-padyatra-akl-ngp पिण्याच्या पाण्याकरीता पदयात्रेला नागपूर शहरात शिरकाव करण्यास मनाई ; यात्रा सुरूच राहणार आमदारांचा निर्धार

file photo:padyatra 




भारतीय अलंकार 24

ॲड.नीलिमा शिंगणे जगड

अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या जल संघर्ष पदयात्रेला नागपूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे 




यात्रे संदर्भात ठाकरे गटाच्यावतीने ५ एप्रिलला नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना यात्रे संदर्भात माहिती आणि परवानगी मिळवण्या करिता अर्ज केला होता. मात्र, विविध करणे देऊन ही यात्रा रोखण्यात आली. मात्र काहीही झाले तरी यात्रा सुरूच राहणार असुन,उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या घरापर्यंत यात्रा पोहाचनारच असा निर्धार आमदार नितिन देशमुख यांनी केला आहे.त्यामुळे हा संघर्ष आता कोणते वळण घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




बाळापूर विधानसभा मतदार संघामधील ६९ खेडी योजनेवरील स्थगिती उठवण्यात यावी यासाठी नितीन देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर पायदळ यात्रा काढली .खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंघोळ घालण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली.  यात्रेने आज नागपुर जिल्हयात पाऊल टाकले असून  २० एप्रिलला नागपूर शहरात  पोहचणार आहे. मात्र, त्याआधीच नागपूर पोलिसांनी शहरात 37 (1) (3) म.पो. का. अन्वये मनाई आदेश लागू असून आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमास परवानगी घेणे बंधनकारक आहे,परंतु आपले कार्यक्रमाबाबत परवानगी करिता अर्ज प्राप्त नाही.तसेच उपमुख्यमंत्रीचे निवासस्थान हे खाजगी निवासस्थान असून त्या ठिकाणी कोणतेही आंदोलन,मोर्चा,लोकांनी एकत्रितरित्या जमा होणे इत्यादी परवानगी देण्यात येत नाही म्हणून सदर ठिकाणी आपणास आंदोलन, मोर्चा, लोकांनी एकत्रितरित्या जमा होणे इत्यादी स्पष्टपणे नाकारण्यात येत आहे असे नमूद असलेलं पत्र नितीन देशमुखांना देण्यात आले. नितीन देशमुख आता काय पवित्रा घेतात याकडे आता अवघा महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


file photo padyatra 



शिवसेना ( उध्वव बाळासाहेब ठाकरे ) अकोला जिल्हा व बाळापूर विधानसभा मतदारसंघ 69 खेडी पाणी पुरवठा योजनेची स्थगिती हटविण्यासाठी आ. तथा जिल्हा प्रमुख नितिन देशमुख व जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतुत्वात अकोला ते नागपुर पिण्याच्या पाण्याकरीता संघर्ष  पदयात्रा 10  एप्रील सोमवारी अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरापासुन सुरू केली. 21 तारखेला उपमुख्यमंत्री यांच्या निवासापर्यंत जाणार आहे. 


टिप्पण्या