court news: महाठग मनिष जैन (कोटेचा) याला दारव्हा न्यायालयातून प्रथम जामिन मंजूर

                ॲड. पप्पू मोरवाल 





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला एमआयडीसीतील 40 कोटींच्या धान्य खरेदी घोटाळ्यातील आरोपी धान्य ब्रोकर मनिष जैन उर्फ कोेटेचा याला दारव्हा न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. विद्यमान न्यायालयाने ॲड. पप्पु मोरवाल (अकोला) यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी मनिष जैन याला रूपये 25 हजारच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केलेला आहे. मनिष जैन विरूद्ध महाराष्ट्रात आठ ते दहा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.



27 मार्च 2023 रोजी सुधिर संपतराज बागरेचा, प्रो. प्रा. अन्नु ट्रेडींग कंपनी, दारव्हा, रा. दुर्गा माता मंदीरजवळ, दारव्हा, जि. यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन, दारव्हा येथे तक्रार दाखल केली होती की, ते सोयाबिन, चना इत्यादी धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात व अकोला येथील राहणार मनिष जैन याच्या उन्नती कॉर्पोरेशन दलालीच्या माध्यमातून त्यांच्यासह सतिष सखाराम गादेवार, रा. चिंतावार लेआउट, आर्णी, अमोल सुधाकर बेलगमवार, रा. वासवी नगर, आर्णी, शिवकुमार कमलकिशोर निमोदीया, रा. गजानन लेआउट, यवतमाळ, सौ. अमृता राजेश गुगलीया, रा. वाघापूर रोड, यवतमाळ व अनिल जौहरीलाल खिवसरा, रा. बाभुळगाव यांनी वेळोवेळी मनिष जैन यांचे मार्फत आरोपी महानंदा कृषी उद्योग, रा. एम.आय.डि.सी. अकोला येथे मागणी अनुसार वेळोवेळी सर्वांनी मिळून रु. 1,30,22,010 /- चे माल पाठविला होता. परंतू वेळोवेळी मनिष जैन व महानंदा कृषी उद्योगचे प्रोप्रायटर यांना पैश्यांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व अश्याप्रकारे आरोपी मनिष जैन याने महानंदा कृषी उद्योग यांच्यासह मिळून सुधीर बागरेचा यांची रू. 8,71,680/-, सतिष सखाराम गादेवार यांची रू. 38,24,979/-, अमोल सुधाकर बेलगमवार यांची रू. 38,93,900/-, शिवकुमार कमलकिशोर निमोदीया यांची 12,56,700/-, अमृता राजेश गुगलीया यांची रू. 3,70,260/- व अनिल जौहरीलाल खिवसरा यांची रू. 28,04,491/- रूपयांची फसवणुक केली आहे. अश्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन, दारव्हा यांनी आरोपी मनिष जैन व महानंदा कृषी उद्योगचे प्रोप्रायटर यांच्या विरुध्द भा.दं.वि. च्या कलम 420, 406, 34 प्रमाणे  27 मार्च 2023 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरहू गुन्हयामध्ये आरोपी मनिष जैन याला पोलिसांनी अटक केली होती. 





सदर प्रकरणात आरोपी मनिष जैन यांच्या वतीने बेल किंग म्हणून ओळखले जाणारे ॲड. पप्पु मोरवाल, अकोला यांनी  06 एप्रिल 2023 रोजी नियमित जामिन अर्ज दाखल केला असता तपास अधिकारी व सरकार पक्षाचे अधिवक्ता यांनी जोरदार विरोध केला व सांगितले की, सदरहू फसवणुक ही रू. 1,30,22,010/- असून जामिन दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल व आरोपी हा फरार होण्याची शक्यता सुध्दा आहे. परंतू आरोपीचे वकील ॲड. पप्पु मोरवाल, अकोला जोरदार युक्तीवाद केला की, आरोपी मनिष जैन हा कायमस्वरूपी अकोला येथील रहिवासी असून त्याने महानंदा कृषी उद्योगचे प्रोप्रायटर विरुध्द आधीच दि. 19/03/2023 रोजी पोलिस अधिकारी, अकोला यांना तक्रार दिलेली आहे व सदरहू वाद हा विवादीत स्वरूपाचा असून यामध्ये आरोपी मनिष जैन याने कोणतेही धान्य माल किंवा पैसे घेतलेले नाही. महानंदा कृषी उद्योग चे प्रोप्रायटर यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे खोटे प्रकरण दाखल करून त्यांना फसविलेले आहे व पोलिस प्रणालीचा वसुलीसाठी गैरवापर सुरू आहे. त्यावेळेस विद्यमान न्यायालयाने ॲड. पप्पु मोरवाल, अकोला यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी मनिष जैन याला रू.25,000/- च्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केले. 





आरोपी मनिष जैन याच्या विरुध्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा ठिकाणी तक्रारी व गुन्हे दाखल असून संपूर्ण महाराष्ट्रामधून दारव्हा येथे महाठग मनिष जैन यांची जामिन मंजूर झाल्याबद्दल ॲड. पप्पु मोरवाल, अकोला यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 




ॲड. पप्पु मोरवाल यांना सदरहू प्रकरणात ॲड. प्रविण तायडे, ॲड. पवार, ॲड. पांडे, ॲड. अक्षय दामोदर, ॲड. पायल तायडे, ॲड. निकीता पुरकर, ॲड. तेजस्विनी पुरी, ॲड. वैशाली गुंडगे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या