biogas-project-at-bhod-of-amc: अकोला मनपाच्या वीस टन प्रति दिवस क्षमतेचा भोड येथील बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित


                                                                              


भारतीय अलंकार 24

अकोला, दि.27:  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भोड येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्‍पाचे काम अंतिम टप्प्यात असुन प्रकल्पातील वीस टन प्रति दिवस क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाचे काम पुर्ण झाले असल्याचे  मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी सांगितले आहे.


हिरव्या पिशवीमध्ये ओला कचरा संकलन 



अकोला महानगरपालिकेव्दारा संपुर्ण शहरात घाउक कचरा निर्माण करणा-या सर्व भाजी मार्केट, फळ मार्केट, मास मच्छी मार्केट, रहिवासी कॉलनी सोसायटी, गृहनिर्माण संस्‍था, हॉटेल्स, रेस्‍टॉरेंट, उपहारगृह, मंगलकार्यालय, खानावळ, इत्यादी प्रतिष्ठानांना ओला कचरा स्वतंत्ररि‍त्या गोळा करुन घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 अन्वये बंधनकारक असल्यामुळे शहरातील सर्व व्यवसायि‍क प्रतिष्ठाने, मार्केट, उपहारगृह यांना स्वतंत्रपणे नियमानुकुल हिरव्या पिशवीमध्ये ओला कचरा संकलित करुन देण्याचे आवाहन अकोला महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.







अकोला महानगरपालिकेव्दारा ओला कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली असुन सर्व संबंधित भाजी मार्केट, फळ मार्केट इत्यादी व्यवसायीक प्रतिष्ठानांनी प्रभागासाठी नियुक्त स्वच्छता निरीक्षक यांच्यासोबत समन्वय साधावा. 



कच-याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन 


अकोला महानगरपालिकेव्दारा पहिल्या टप्यामध्ये मोठया व्यवसायीक प्रतिष्ठान, रहिवासी वसाहत यांचेकडुन कच-याचे वर्गीकरण झाले नसल्यास, कचरा न स्विकारण्याच्या आदेश आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका अकोला यांनी दिले असून घाउक कचरा निर्मिती करतांना ओला कचरा व सुका कच-याचे वर्गीकरण न झाल्यास त्यांचे विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्यामुळे सर्व संबंधितांनी शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने कच-याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे केले आहे. 

टिप्पण्या