big accident-paras-akola- rain: पारस दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यु; 4 जणांची ओळख पटली, 20 व्यक्ती जखमी, त्यापैकी 5 व्यक्ती गंभीर जखमी




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रविवार 09 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान बाळापुर तालुक्यातील मौजे पारस येथील बाबुजी महाराज मंदीरामध्ये रविवारच्या महाआरतीकरीता लोक जमले होते. सदर ठिकाणी टिनशेड सभागृहावर जवळ असलेले निंबाचे झाड चक्रीवादळामुळे टिनशेडवर पडून टिनशेडखाली दबुन 7 लोक मृत्यु असुन 20 व्यक्ती जखमी झाले आहे. त्यापैकी 5 व्यक्ती गंभीर जखमी आहेत. जखमींवर शासकीय वैदयकीय  महाविदयालय अकोला उपचार सुरु आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु असुन नावे प्राप्त होताच तातडीने सादर करण्यात येतील. सदयस्थितीत बचावकार्य पुर्ण झाले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.



दरम्यान महसुल व वन विभाग शासन निर्णय दि. 27 मार्च 2023 नुसार मदतीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.

मृत व्यक्ति साठी रु 4.00 लक्ष मदत देय आहे. 40 ते 60 टक्के अपंगत्व 74000/- मदत देय आहे. 60 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व 2 लक्ष 50 हजार मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात असल्यास 16000/- मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात असल्यास 5400/- मदत देय आहे.




या घटनेत दुर्दैवी मृत झालेल्यांची ओळख पटली असून,

1.उमा महेंद्र खारोडे वय 50 वर्ष मु.फेकरी, दिपनगर ता. भुसावळ जि.जळगांव, 

2.पार्वतीबाई महादेव सुशीर वय 55 वर्ष,मु.भालेगांव बाजार ता. खामगांव जि.बुलडाणा

3.अतुल श्रीराम आसरे वय 35 वर्ष,मु.बाभुळगांव ता.अकोला

4.मुरलीधर बळवंत अंबारखाने वय 55 वर्ष मु. पारस ता. बाळापुर जि. अकोला

अशी त्यांची नावे आहेत. अन्य मृतांची अद्याप ओळख पटायची आहे.



दरम्यान उशिरा रात्री विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी जी एम सी येथे भेट देऊन जखमीची विचारपूस केली व उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.


पारस ता. बाळापूर येथील दुर्घटनेत जखमी झालेल्या 26 रुग्णांची यादी 




टिप्पण्या