big accident-paras-akola- rain: अवकाळी पाउस: पारस मध्ये आरती सुरू असताना मोठी दुर्घटना:4 जणांचा दुर्देवी मृत्यू, जखमींवर उपचार सुरू




भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात सायंकाळची आरती सुरू असताना टिनशेडवर एक जुने झाड कोसळले आहे. यामध्ये 40 ते 50 जण टिनशेडखाली दबले गेले असल्याची माहिती आहे. यापैकी 4 जणांचा दुर्देवी मृत्यू देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून बचावकार्यास सुरूवात केली आहे.





बाबूजी महाराज मंदिराच्या समोर असलेले झाड पडले असून बरेच लोक झाडाखाली दबलेली असून त्यांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमींना वाचविण्यासाठी आमदार रणधीर सावरकर पारस गावात घटनेचे गांभीर्य ओळखून बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 






आज झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पारस ता.बाळापूर जिल्हा अकोला येथील बाबूजी महाराज संस्थानच्या सभामंडपाचा स्लॅब पडून अनेक भाविक गंभीर जखमी झालेत व काहींचा करूण अंत झाला याबाबत माहिती मिळताच त्वरीत घटना स्थळी दाखल होऊन जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. 






जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून जिल्हा प्रशासनाला ऍक्टिव्ह मोडवर येण्याचे निर्देश पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.




जमखमींवर शासकीय रुग्णालयात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते सर्व सेवे करता घटनास्थळी उपस्थित असून पुढील परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत आम्ही सर्व पीडितांच्या सोबत भक्कम पणे उभे आहोत.




आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय  धोत्रे यांनी आपले पुत्र अनुप धोत्रे व आपले पी ए मोहन पारधी मेन हॉस्पिटलमध्ये पाठवून उपचाराची व्यवस्था चांगली झाली पाहिजे व जखमी झालेल्या सर्व तरी मदत करा असे निर्देश दिले.





मानवता धर्म पाळणारे खासदार संजय धोत्रे यांनी भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर  सावरकर यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन व त्यांच्या माध्यमातून राज्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मृतक परिवारांना मदत मिळावी तसेच जखमींना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच महसूल इलेक्ट्रिक विद्युत विभाग तसेच आरोग्य सेवा तसेच विविध सामाजिक संघटना यांनी चांगली सेवा उपलब्ध केल्यामुळे समाधान व्यक्त करून संकट काळात सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना करावा भविष्यात अशा घटना घडू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.




पालकमंत्री नामदार व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेऊन आरोग्य विभागाला नागपूर येथे रुग्णांना गरज असेल तर ताबडतोब मिळण्याची व्यवस्था साठी सूचना दिल्या आहेत.  वीज वितरण कंपनीला खूप यंत्रणा उभी करून 33 गावांची लाईन जी केली आहे ती सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहे आमदार रणधीर सावरकर यांच्याकडून तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी आरोग्य विभाग यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण लक्ष केंद्रित करून ठेवले आहे.

महाराज संस्थान या परिसरात पश्चिम विदर्भातून रविवारच्या दिवशी मोठी भाविक भक्तांची गर्दी असते आणि ही घटना वेदनादायी दुर्दैवी असून अतिवृष्टी तसेच अवकाली पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले असून घटनेची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी नामदार फडणवीस यांना देऊन व मुख्यमंत्र्यांना देऊन जखमींची परिस्थिती संदर्भात माहिती दिली तसेच घटनेची संपूर्ण माहिती देऊन मानवता कार्याला गती देण्यात येणाऱ्या सर्व संघटनेचे त्यांनी माहिती दिली


 




टिप्पण्या