babasaheb-ambedkar-jayanti: भिम जन्मोत्सव निमित्ताने शिक्षण क्रांती अभियान अंतर्गत भाग्यश्री इंगळे यांचा भिमगीतांचा कार्यक्रम 15 एप्रिलला



 


ठळक मुद्दा 

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या सह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती 





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला जगभरात साजरी होते. त्याचं  भिम जन्मोत्सव निमित्ताने  शिक्षण क्रांती अभियान अंतर्गत सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांचा  भिमगीतांचा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, जुने शहर, अकोला येथे 15 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता होणार असून या  कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा. अंजली आंबेडकर असणार आहेत, अशी माहिती भीम जन्मोत्सवाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ता किरण आनंदराव शिरसाट यांनी सोमवारी शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 





प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरवादी मिशन नांदेडचे प्रमुख दीपक कदम हे असतील कार्यक्रमाचे उद्घाटक  तिक्षणगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष सुगत वाघमारे असणार आहेत आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लेखा व कोषागार विभाग  सहसंचालक औरंगाबाद विभाग औरंगाबादचे उत्तम सोनकांबळे असतील.  




कार्यक्रमाला  प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अकोला, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे तसेच विशेष उपस्थिती जी. श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली, प्रा. मुकूंद भारसाकळे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, अकोला यांची असेल, अशी माहिती यावेळी शिरसाट यांनी दिली. 



गेल्या 3 वर्षेपूर्वी जगभरात  कोरोना पसरला होता त्यामुळे शासनाने सर्व  सर्वजण कार्यक्रमावर बंदी घातली होती. त्यामुळे  भीम जन्मोत्सव बंद झाला होता. मात्र, यावर्षी भीम जन्मोत्सव साठी कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. त्यामुळेच विश्वमानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव  डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात साजरा होत आहे.  




समस्त भिम नगर मित्र परिवार, अकोलाच्या सहकार्याने या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप दिले आहे. त्यामुळे देशात सुप्रसिद्ध असलेली  गायिका भाग्यश्री इंगळे यांच्या गायनाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होत आहे. 





कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक किरण शिरसाट, मनोज  शिरसाट, आशु  शिरसाट, आकाश शिरसाट (सम्राट अशोक सेना अध्यक्ष), अश्विन शिरसाट (सोनु), गौतम गवई, सुरेद्र वाकोडे, संधि टोबरे, उमेश गोपनारायण, युवराज गवई, रत्नदिप खंडारे, उमेश चक्रनारायण, प्रमोद तायडे, कुणाल शिरसाट, हेमंत शिरसाट, विनोद शिरसाट, अमोल भातकुले, राहुल शिरसाट, अजय गवई, आशुतोष शेगोकार, दिनेश शिरसाट, पंकज इंगोले, पवन शिरसाट, सनी शेगोकार, रोशन शिरसाट, दादु शिरसाट, योगेश गोपनारायण, सोनु वानखडे, संग्राम शिरसाट, सौरभ शिरसाट, आशिष सिरसाट (कान्हा), नितीन संकत, कपिल अशोक शिरसाट, अमित तेलगोटे, रितेश सदाशिव संदिप शिरसाट, अतुल तेलमोरे, निखील शिरसाट, प्रशांत तायडे, समिर भोजने,  स्वप्नील शिरसाट, निखील वानखडे, शशांक तेलगोट, अभिजीत गवई, आशिष आठवले, गोविंद शिरसाट, सचिन तेलगोटे, दिपक गवई, विजय तायडे, सचिन तायडे, कुणाल तायडे, मनिष इंगळे, शशांक शिरसाट, शशिकांत शिरसाट, प्रेम शिरसाट, मुन्ना शिरसाट, सनी शिरसाट, आदित्य शिरसाट, तुषार शिरसाट, निखील शिरसाट, यश शिरसाट, प्रनय शिरसाट, अमोल तायडे,देवानंद चौरपगार, किरण माहुरे, निलेश वानखडे, सुमित डोंगरदिवे, मोन्टु शिरसाट, अक्षय शिरसाट, राहुल शेगोकार, प्रविण ओवे, अतुल ओवेकर, रुपेश इंगळे, आशिष इंगळे, भारत सरोदे, धरम वाकोडे, समस्त भिम नगर मित्र परिवार अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या