apmc-election-voting-begins : अकोला, अकोट, बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात; 128 उमेदवार रिंगणात





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्ह्यातील अकोला, अकोट आणि बार्शिटाकळी या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. तिन्ही बाजार समित्यांमध्ये विविध मतदारसंघात 128 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भाग्य आज मतपेटीत सीलबंद होत आहे. 



मतदान आज दुपारी चार वाजेपर्यंत होणार आहे. या तिन्ही बाजार समिती करिता मतमोजणी 29 एप्रिलला सकाळी 9 वाजता पासून होणार आहे.




उमेदवार आजमावत आहेत भाग्य 



प्रत्येकी 18 संचालकपदाकरिता ही निवडणूक होत आहे. 



अकोला कृउबात 32 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी 5 उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.



अकोट कृउबात एकूण 60 पैकी 2 उमेदवार अविरोध होऊन आता 58 उमेदवार रिंगणात आहेत. 



बार्शिटाकळी कृउबात एकूण 40 उमेदवार आपले भाग्य अजमावत आहे.






प्रथमच वंचित बहुजन आघाडी रिंगणात 



या निवडणुकीत प्रथमच वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले असल्याने यंदाचीही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्ह आहे. बार्शीटाकळी कुउबास मध्ये भाजपने महाविकास आघाडी सोबत युती केली तर  बहुजन वंचित आघाडी व शेतकरी पॅनल यांच्या युतीमुळे निवडणुकीमध्ये जोरदार चुरस निर्माण झालेली दिसत आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून, प्रामुख्याने धाबेकर व लहाने गटाचे वर्चस्व या समितीवर दीर्घकाळ होते, हे विशेष. अकोट कुउबास मध्ये वंचित आणि कास्तकार पॅनल युती आहे.  






30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मतदान होणार आहे.

टिप्पण्या