apmc-election-election-akola: सहकार पॅनलची सत्ता कायम





भारतीय अलंकार 24

अकोला: अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सहकार पॅनलनं गढ कायम राखला. अकोला बाजार समितीमध्ये  चाळीस वर्षांपासून वर्चस्व असलेल्या सहकार पॅनलचे पंधरा उमेदवार निवडून आले असून सहकार पॅनलची सत्ता कायम आहे. यंदाच्या या निवडणुकीत प्रथमच वंचित बहुजन आघाडीने उडी घेतली होती. अकोला कुउबासच्या १८ जागांसाठी  वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत मतदार संघातून ४, सेवा सोसायटी मधून ५ उमेदवार उभे केले होते. मात्र वंचितचा एकही उमेदवार निवडून न आल्याने वंचित बहुजन आघाडीचा अकोला कुउबासत धुरळा उडाला.एकंदरीत वंचित बहुजन आघाडीला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आले होते.



कृषी बाजार समितीत सुद्धा वंचित बहुजन आघाडीने एन्ट्री केलीय..बाजार समितीच्या निवडणुकीत वंचिटने पहिल्यांदाच आपले उमेदवार उभे केले होते.. अकोला कुउबासमध्ये जरी वंचित ने खात उघडलं नसलं तरी बार्शीटाकळी कुउबास मध्ये वंचितने 3 जागा मिळवल्या आहे . येथे वंचित बहुजन आदघाडीला रोखण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात भाजप , दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी सोबतमिळून शेतकरी संघर्ष समिती  पॅनल तयार करण्यात आलं होतं. तर वंचीत बहुजन  आघाडीने शेतकरी परिवर्तन सोबत पॅनल तयार केलं होतं या बाजार समितीवर काँग्रेसचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर आणि भाजपचे लहाने गटाच वर्चस्व आहे. आज (शनिवारी)प्राप्त झालेल्या निकालानुसार शेतकरी संघर्ष समिती  पॅनलने जोरदार विजय मिळवला आहे.



बार्शीटाकळी कुउबास पक्षीय बलाबल..


काँग्रेस : ६

भाजप : ३

राष्ट्रवादी काँग्रेस : २

शिवसेना उद्धव ठाकरे : २

तर 

वंचित बहुजन आघाडी : ३



अकोला बाजार समिती २ हजार ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  मतमोजणीत तब्बल ४१० मत अवैध ठरविण्यात आली. आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात सर्वाधिक ७२ मतं अवैध ठरली तर व्यापारी, अडते मतदारसंघात एकही मत अवैध ठरले नाही .



अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत सहकार पनलचा दणदणीत विजय झाला सहकार पनलचे १५ पैकी १५ उमेदवार विजयी झाल्याने सहकार गटाने सहकार क्षेत्रावरील पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणूकीत शेतकरी, कास्तकार व जयकिसान पनलचा पराभव झाला.


सहकार पनलच्या विजयी उमेदवारात (सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून- बाबुराव रामश्चंद्र इंगळे, गजानन गोविंदराव डाफे(२६९), विजय मधुकरराव राहाणे(२९९),प्रशांत पाचडे(३३४) धिरज रमेशराव हिंगणकर (३१६), अतुल वामनराव खोटरे (३१३), श्याम पुर्णाजी तरोळे (२८५)


इतर मागासवर्गिय राखीव मतदार संघात - अविनाश मोहनराव जायले (३०७),, महिला मतदार संघात -अरुणा राजीव आतकड (३१५), व अंजली जा . विशाल सोनोने (३१६), भटक्या विमुक्त 

जाती मतदार संघात रमेश काशिनाथराव उमे त वानखडे (३४१) तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघात कुलदिप भिमराव वसू (२६२)व गोपाल ज्ञानदेवराव सपकाळ (२१४), अनुसूचित जाती मतदार संघातून- प्रमोद रामचंद्र खंडारे (२२०), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शंकरराव विठ्ठलराव लोखंडे(२३३) यांचा समावेश आहे.


तर हमाल व व्यापारी मतदार संघातून विजयी झालेले अजमल खान आसीफ खान सहकार पनलला बिनशर्त पाठींबा जाहीर केल्याने सहकार पनलचे १६ उमेदवारांचे संख्याबळ झाले आहे. यापूर्वीच व्यापारी अडते मतदार 

संघातून सुनिल गावंडे व रितेश अग्रवाल अपक्ष म्हणून अविरोध निवडून आले आहेत. 



दरम्यान राज्यातील १४७ पैकी १४५ समित्यांचे निकाल हाती आले असून ८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप गटाला अवघ्या ४८ बाजार समित्यांमध्ये विजय प्राप्त झाला असून सत्तेसाठी काही पण म्हणून सर्वपक्षीय आघाड्यांनी सुद्धा ३७ ठिकाणी विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. वृत्त लिहिपर्यंत भाजप ४०, शिंदे ७, राष्ट्रवादी ३८, काँग्रेस ३१, शिवसेना (ठाकरे) ११, शेकाप ४ तर इतरांनी १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. राज्यातील बहुतांश नेत्यांनी आपापले बाजार समित्यांमध्ये गड राखले असले तरी निकालांवरुन मविआ आणि भाजपनं वेगवेगळे दावे केले जात आहेत. 


टिप्पण्या