akola forest department raid: ठाकूर अमरसिंह जडीबुटी दुकान व गोडाऊनवर अकोला वन विभागाचा एकाचवेळी छापा; वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त, चार जणांना अटक





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भातील प्रख्यात जडीबुटी व्यावसायिक अमरसिंह ठाकूर यांच्या दोन दुकानांवर बुधवारी अकोला वनविभागाने छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली. या कारवाईत वन्य प्राण्यांचे अवशेष, प्रतिबंधीत जडीबुटी आणि समुद्री जीवांचे अवशेष जप्त करण्यात आले असून मालकासह चार जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. 




अमरसिंह ठाकूर नावाने ओळखले जाणारे या जुन्या प्रतिष्ठानच्या मोहम्मद अली रोड येथील दुकानासह मानेक टॉकीज मागील गोडावून येथे एकाच वेळी छापा टाकण्यात आला. दोन्ही ठिकाणी वनविभागाने केलेल्या तपासणीत हरणाच्या सिंगाचे तुकडे, सायाळ प्राण्यांचे काटे आणि घोरपडचे अवशेष सापडले आहेत.तसेच हत्ती दातांची पावडर, समुद्रातील ब्लॅक कोरंल प्राण्याचे अवयव सापडले आहेत.


मानेक टॉकीजचे मागील गोडाऊन मध्ये आढळून आलेल्या वस्तू या वाघ आणि बिबट यांचे दात आहेत का, याचा तपास वन अधिकारी करणार आहेत. याठिकाणी  प्रतिबंधित असलेल्या काही वनस्पतींची सुकलेल्या झाडांच्या मुळ्या आढळून आल्या आहेत.




वन विभागाचे उपवनसंरक्षक के. आर अर्जुना यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डांगे, वनपाल गजानन इंगळे, वनपाल सुनील राऊत, वनरक्षक प्रियंका इंगळे, वनरक्षक फिरते पथकाचे मोरे, तायडे, बागबाण, स्वप्नील राऊत, अनिरुद्ध चौधरी आदी वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


टिप्पण्या