unique-marriage-in-rail-dharani: गोष्ट एका लग्नाची: शंकर अन् पार्वतीचा रेल धारणी मधील पारंपारिक अनोखा विवाह…



भारतीय अलंकार 24

अकोला : अकोला जिल्ह्यातील रेल धारणी या गावातील एका हटके लग्नाची गोष्ट... या लग्नाला ६०० ते ७०० वर्षाची परंपरा लाभली आहे. लग्नात वाजंत्री, पाहुणे, जेवणावळी, मानपान सर्व काही आहे..या लग्नात नवरी आणि नवरदेवच्या मूर्ती समोरासमोर ठेवून हे लग्न लावण्यात येते. 


वऱ्हाडी मंडळींचा तुफान डान्स , वाजंत्री, तुतारी, सनई चौघडे.. जेवणावळी.. कोणत्याही लग्नातील असंच  काहीसं चित्र आणि नजारा असतो..याही लग्नात सर्व काही असंच होतं. हे लग्न होतं महादेव अन पार्वतीचं.. शंकर-पार्वती विवाह सोहळ्याची ही परंपरा अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या रेल या गावानं गेल्या  ६०० ते ७०० वर्षांपासून जोपासली आहे..गावातील महादेव कोळी या आदिवासी समाजानं ही परंपरा अजूनही जोपासली.


दरवर्षी गावातील दोन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई- वडिलांचा मान दिला जातो. लग्नाच्या दिवशी मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींची सरबराई करण्यात गावातील प्रत्येकजण गुंतलेला असतो.. गावातील घुगरे कुटूंबियांकडे वरपक्षाचा तर इंगळे परिवाराकडे वधुपक्षाचा मान परंपरेने आहे.. हा विवाह सोहळा पाहण्याकरीता दूरदूरन भाविक न चुकता उपस्थित राहतात .. राज्यातील अनेक जिल्ह्यातील  वऱ्हाडी व गावातील मंडळीही या लग्नासाठी आवर्जून गावात हजर असतात. 


वर्षभर या मंदिरात भाविक राज्यभरातून मोठ्या संख्येने दर्शनाला येतात..या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी सरकार दरबारी केली आहे, असे ग्रामस्थ सुधाकर घोगरे यांनी सांगितले.







टिप्पण्या