ramnavmi 2023: अकोट मधील विद्यांचल शाळेत श्रीप्रभू रामचंद्रांचा अवतरण दिवस साजरा




भारतीय अलंकार 24

अकोट: आज रामनवमी म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस.आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट येथील विद्यांचल शाळेत रामनवमीचा औचित्य साधून अवतरण दिवस साजरा करण्यात आला.




महापुरुषांच्या जन्मदिनाला अवतरण दिवस असे म्हंटले जाते.जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो आणि वाईट शक्ती निसर्गाच्या नियमांची उलथापालथ करू लागतात, अशा स्थितीत देव अवतार घेतो.मानवजातीसाठी युगानुयुगे अनुकरणीय ठरेल अशा पद्धतीने वागणाने आदर्श महापुरुष आणि सर्व ऐश्वर्यांसह श्रीराम त्रयतायुगातील चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमीला अयोध्येत अवतरले होते.प्रत्येक पुरुषात प्रभू रामचंद्र सारखा चरित्र असावा या भावनेने विद्यांचल शाळेत 300 वर विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान केला.यावेळी चिमुकल्यांना लाल फेटे आणि लाल कपडे परिधान करून शाळेत रॅली काढून प्रत्येक विद्यार्थीचा पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आल.परिसरात प्रत्येक विद्यार्थीचे फोटो सुद्धा लावण्यात आले होते.




विद्यांचल शाळेत वर्षभर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करिता विविध उपक्रम शाळेचे संचालक दिनेश भुतडा राबवित असतात.यावेळी प्रभू रामचंद्रांचे गुण आत्मसात व्हावे याकरिता नाटक आणि संगीतच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आलं,  अशी माहिती संचालक दिनेश भुतडा यांनी दिली.





टिप्पण्या