old pension scheme: akola: जुनी पेन्शन योजना : 'मिशन एकच जुनी पेन्शन' निदर्शने देत अकोला जिल्ह्यातील हजारो सरकारी निमसरकारी कर्मचारी उतरले रस्त्यावर






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी समन्वय समिती मार्फत मंगळवार, 14 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात अकोला जिल्ह्यातील सुमारे 75 हजार कर्मचाऱ्यानी पाठिंबा दिला  असून, निदर्शने मोर्चा मध्ये जवळपास 8 हजार संपकरी सामील होवून 'मिशन एकच जुनी पेन्शन' अशा गगनभेदी घोषणा देत पेन्शन...पेन्शन... पेन्शन... म्हणत एका तालात टाळ्या वाजवित मागणी लावून धरली. 



जिल्ह्यातील सर्वच सरकारी कर्मचारी संघटना पदाधिकारी व सदस्य मंगळवारी सकाळी 11 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय समोर एकत्रित आले. येथुन सर्व कर्मचाऱ्यांचा मोर्चा पायी चालत अशोक वाटिका परिसराकडे मार्गस्थ झाला. 'एकच मिशन, जुनी पेन्शन' या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. बस स्थानक चौकातून वळत गांधी रोड, पंचायत समिती समोरून जिल्हा परीषद मार्गाहून परत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोहचला. यानंतर मागण्यांचे निवेदन शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांच्या कडे सोपविले.




मागण्या मान्य हाेइपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही- राजेंद्र नेरकर 


गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात विविध संघटनांनी चर्चा, निवेदने दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर ठाम राहत असून मागण्या मान्य हाेइपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, असे ठाम पणे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती अकोला जिल्हा अध्यक्ष तथा निमंत्रक राजेंद्र नेरकर यांनी सांगितले. 




या आहेत मागण्या 


राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या शासन मान्यतेसंदर्भात शासनादेश पारित करा, नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करा. नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.




यांनी केले नेतृत्व


अध्यक्ष  तथा निमंत्रक समन्वय समिती अकोला राजेंद्र नेरकर, माजी अध्यक्ष सुभाष काशीद, कोषागार संघटना अध्यक्ष अशोक सराफ, सरचिटणीस म. क. र. समिती नितीन निंबुळकर ,राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सुनील जानोरकर, महसूल कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष मंगेश पेशवे, कोषाध्यक्ष सुभाष सिरसोई, ग्रामसेवक संघटना अकोला जिल्हा रवी काटे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला राजेश देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना अकोला गजानन उघडे, जिल्हाध्यक्ष वाहन चालक संघटना विलास वडतकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन संघटना गिरीश मोगरे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर, विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन अकोला शेख चांद कुरेशी, सफाई कर्मचारी संघटना पंचायत समिती अकोला विलास चावरे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 अकोला एस. ओ. डाबेराव, एस. एस. बाठे सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.डी .चव्हाण, प्रकल्प कार्यालय अकोला जी आर मोरे, पी.एम. बनसोड, एम व्ही बोपटे, ए .एम. कोरपे, अध्यक्ष  कर्मचारी महासंघ अकोला वाशिम, प्रसिद्धी प्रमुख आरोग्य कर्मचारी महासंघ अकोला वाशिम एस आर चंदन, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना कोषाध्यक्ष एस. एम. देशमुख, संतोष पाटील, आर. डी. काटे, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जी. डी. उघडे, जिल्हा परिषद अभियंता संघटना एम. एच. पुनसे, ए. बी. गुडधे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा, राज्य प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मारुती वरोकार, राज्य प्रवक्ता उर्दू शिक्षक संघटना जव्वाद हुसेन, संस्थापक सदस्य महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रामदास वाघ, कल्पना जोगी आदींच्या नेतृत्वात हजारों महिला व पुरुष कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.


दिव्यांग कर्मचाऱ्यांचा पाठिंबा 


समाज कल्याण विभागगातील गोपाल वाघमारे यांच्या सह शेकडो दिव्यचक्षु, दिव्यांग कर्मचारी बांधव भगिनींचा मोर्चात सहभाग होता.



वाद्य वाजवीत मोर्चात सहभाग 


पंचायत समितीचे कर्मचारी या संपात डफ वाजवित सहभागी झाल्याने मोर्चात वेगळे चैतन्य पसरले होते.






कृषि विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा सहभाग 



कृषि विद्यापीठ कर्मचारी कल्याण संघ (कृषि विकास), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला 'सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करा या मागणी साठी 14 मार्च पासुन बेमुदत राज्य व्यापी संपात सहभागी होण्याबाबत निवेदन सादर केले होते. त्याच अनुषंगाने आज रोजी 14 मार्च पासुन विद्यापीठातील डीसीपीएस , एनपीएस धारक शिक्षक-शिक्षकेत्तर, अधिकारी , कर्मचारी  संपामध्ये राज्य संघटनेच्या आव्हानाला समर्थन देवुन संपामध्ये सहभागी होत आहोत. तसेच जुनी पेन्शन लागु असलेले शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी काळ्या फिती लावून बेमुदत काम बंद राज्यव्यापी संपास पाठिंबा देतील. यामुळे होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहिल,अशी माहिती डॉ. अध्यक्ष संजय कोकाटे यांनी दिली.





टिप्पण्या