Negotiable Instrument Act: धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस सश्रम कारावासची शिक्षा


फिर्यादीतर्फे अधिवक्ता पप्पू मोरवाल 





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  एक महिन्याचा सश्रम कारावास व नुकसान भरपाई , नुकसान भरपाई न दिल्यास 15 दिवसाची साधी कैद अश्याप्रकारची शिक्षा धनादेश अनादरीत प्रकरणामध्ये दोषी आढळलेला आरोपी गणेश रामदास देवळे (रा. दत्ता टेम्पल, नागपुर) यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्र. ८ (अकोला) यांनी सुनावली आहे.








थोडक्यात माहिती प्रमाणे फिर्यादी नामे महेश तुकाराम ढुके व आरोपी हे एकाच मेडीकल रिप्रेझेन्टेटीव व्यवसाय करीत असल्याने व एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखत असल्यामुळे 27/12/2017 रोजी आरोपीने फिर्यादीकडून रु. 40,000/- हात उसने म्हणुन फिर्यादीचा मित्र नामे राहुल शामराव ढवळे यांच्याकडून हातऊसने घेवून विनावाजाने त्याच्याच समक्ष ऊसनवार पावतीव्दारे नकदी रोख रक्कम दिले होते. फिर्यादीने काही दिवसानंतर दिलेली रक्कम आरोपीला मागणी केली असता आरोपीने कायदेशीर जबाबदरी स्विकारुन फिर्यादीस रक्कम आय.सी.आय बँक शाखा हिंजेवाडी पुणे, चा एक धनादेश कंमाक दिला. परंतू सदरहू धनादेश हा खात्यामध्ये पुरेसी रक्कम नसल्याकारणाने अनादरित झाला. त्यामुळे फिर्यादी तर्फे अधिवक्ता ॲड. पप्पु एस. मोरवाल यांनी आरोपीला कायदेशीर नोटीस व्दारे दिलेल्या रक्कमेची मागणी केली. परंतू मर्यादीत कालावधीत आरोपी याने पैसे परत न केल्यामुळे अधिवक्ता पप्पु मोरवाल यांनी आरोपी विरुध्द  न्यायालयात पराक्रम्य संलेख अधिनियम कायदा 1881  (Negotiable Instrument Act) कलम 138 नुसार प्रकरण दाखल केले. 




सदरहू प्रकरणामध्ये फिर्यादी तर्फे फिर्यादी यांचा सर तपास दाखल करण्यात आला.त्याला आरोपीचे वकील यांनी उलट तपास घेतला व त्यानंतर फिर्यादी तर्फे ॲड. पप्पु एस. मोरवाल यांनी युक्तीवाद करुन भक्कमपणे कायदयाची बाजु मांडुन धनादेश अनादरीत प्रकरणामध्ये कश्याप्रकारे आरोपीने फिर्यादीची फसवणुक केली व गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असे पटवून दिले. 




फिर्यादीचे अधिवक्ता ॲड. पप्पु मोरवाल व त्यांचे सहकारी ॲड. प्रवीण आर तायडे, ॲड. अक्षय दामोदर, तसेच विधी विद्यार्थी सौरभ दहाके, प्रज्वल गांवडे, सृष्टी ठाकरे, मिताली लखवानी, पल्लवी एकाडे यांनी प्रथमच सदरहू प्रकरणामध्ये विद्यार्थी दशेत असतांना कामकाज पाहिले व सहकार्य केले. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकुन न्यायालय अकोला येथील अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकारी व वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश क्र. ८ यांनी आरोपीस 15 / 03 / 2023 रोजी गुन्हा सदोष ठरवून शिक्षा सुनावली.

टिप्पण्या