dishonor-of-cheque-case-akl: धनादेश अनादर प्रकरणी आरोपी भीमराव किर्तकची निर्दोष मुक्तता






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  धनादेश अनादर प्रकरणी आरोपी भीमराव किर्तकची 16 मार्च 2023 रोजी विद्यमान दुसरे सह दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती शितल एस. बांगड यांनी एन. आय. ॲक्टचे कलम 138 अंतर्गत  दाखल प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.




असे घडले प्रकरण

प्रकरणाची हकीगत अशी की, आरोपी भीमराव अजाबराव कीर्तक यांनी फिर्यादी कमलाबाई इंगळे व त्यांचे पती शिवदास इंगळे यांच्या सोबत घर विकत घेण्याचा सौदा हा सन 2016 मध्ये केला होता. सदर घराचा रुपये 18 लाख मध्ये सौदा पक्का केला होता. त्यापैकी इसार रक्कम थोडी थोडी करून पहिल्यांदा चार लाख रुपये आणि त्यानंतर दोन लाख असे एकूण रु. सहा लाख हे नोटरी दस्त नोंदणी प्रक्रिया करून दिले होते, आणि बारा लाख रुपये हे होम लोन काढून डीडी द्वारे फिर्यादीला दिले होते. सदर सौदयाची रक्कम 18 लाख फिर्यादीला मिळाल्यामुळे फिर्यादीने आरोपीला घर खरेदी करून दिले होते, आणि आरोपीने बँकेकडून घेतलेले गृह कर्जाची रक्कम ही आरोपीच्या खात्यात जमा झाल्यास सदर रक्कम काढण्यासाठी आरोपीने त्याचे सहीचे सहा कोरे चेक हे दिनांक 29/05/2017 रोजी फिर्यादिला दिले होते.


 

सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आरोपीने वारंवार फिर्यादीला त्याच्याकडे असलेले धनादेश परत करण्यासाठी विनवणी केली आणि खरेदी खर्चाचा खर्चाचे अर्धे पैसे मागितले होते. परंतु, फिर्यादीला ते पैसे देणे नसल्याने व आरोपीला खोट्या प्रकरणात अडकविण्याचे असल्या कारणाने फिर्यादीने आरोपी विरुद्ध सन 2018 मध्ये एकूण तीन प्रकरणे दाखल केले. त्यापैकी दोन प्रकरणे ही विविध न्यायालयाने खारिज केली आणि शेवटी सदर प्रकरण हे विद्यमान न्यायालय समक्ष चालवण्यात आले. या  प्रकरणात फिर्यादीने स्वतःचा पुरावा दिला आणि आरोपीने स्वतःचा पुरावा, दोन बँक अधिकारी यांची बचाव साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवली. 



अधिवक्ता गणेश परियाल यांनी न्यायालयात जोरकसपणे बाजू मांडली 


सदर प्रकरणात आरोपीने सदर धनादेश परत न मिळाल्यामुळे बँकेमध्ये 30 नोव्हेंबर 2017 ला फिर्यादीला दिलेल्या संपूर्ण धनादेशाच्या बाबत कुठलेही आर्थिक व्यवहार करू नये याबाबत स्टॉप पेमेंट करण्याचे अर्ज दिले ही बाब मान्य केली. परंतु फिर्यादीने या बाबीकडे दुर्लक्ष करून फेब्रुवारी 2018 मध्ये रुपये साडेतीन लाखचे विविध रकमेचे धनादेश बँकेमध्ये सादर करून आरोपी कडून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर धनादेश हे स्टॉप पेमेंट मुळे परत आल्यामुळे आरोपीला फिर्यादीने सदर  धनादेश रकमेची नोटिस पाठविली आणि त्या चेकची रक्कम  मागणी  केली. परंतु आरोपी कडून कुटलाही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून फिर्यादिने सदर आरोपी विरुद्ध एन.आय. ॲक्ट चे कलम 138 नुसार विद्यमान न्यायालय श्रीमती शितल एस बांगड यांनी सदर प्रकरणातील आरोपीच्या वतीने वकिलांचा मांडलेला युक्तिवाद व धनादेशचा झालेला दुरुपयोग व सदर धनादेश हे कुठलेही कायदेशीर देणे असलेल्या रकमेपोटी दिलेले नसल्याचे सिद्ध केले आणि सदर धनादेश हे सुरक्षा ठेव पोटी म्हणून दिल्याचे सिद्ध केले.  त्या धनादेशाचा दुरुपयोग करून फिर्यादी हिने सदर इसाराची रकमेबाबत व अडीच लाख मिळाले असे कोर्टात समक्ष सागितले. परंतु सर्व बाबी आरोपीतर्फे खोडून टाकण्यात आल्या आणि धनादेश कधी कोणत्या तारखेला व कुठे दिले याबाबतचा कुठलाही सबळ पुरावा फिर्यादी ही कोर्टा समक्ष आणू न शकल्याने ह्या सर्व बाबी ग्राह्य धरून आरोपीला सदर प्रकरणातून निर्दोष सोडवले. सदर प्रकरणात आरोपी तर्फे अधिवक्ता गणेश परियाल यांनी जोरकसपणे बाजू मांडून आरोपीला न्याय मिळवून दिला. 

टिप्पण्या