court news: अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये विक्री करुन शोषण केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता





भारतीय अलंकार 

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन मुलीला राजस्थानमध्ये विकून बलात्कार केल्याच्या आरोपातून सहा आरोपींची सबळ पुरावा अभावी न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे.





थोडक्यात घटना अशी की, रेलवे फलाट 1/3 येथे कचरा जमा करून उदरनिर्वाह करणाऱ्या फिर्यादीच्या मुख्यत उर्फ मनिषा नावाच्या महीलेने फिर्यादीच्या मुलीला सुरत येथे लग्न लावुन दिल्याची माहीतीवरून कलम 363, 366 (अ) प्रमाणे पोलीस स्टेशन खदान येथे दि. 13.12.2019 रोजी फिर्यादीच्या रिर्पोट वरून गुन्हा दाखल झाला होता. 




त्यावरून खदान पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महीला पोलीस उपनिरिक्षक सुकेशनी जमधाडे यांनी सदर प्रकरणाचा तपास केला त्यामध्ये असे आढळुन आले की, सदर फिर्यादीची मुलगी हिला राजस्थान येथे विकण्यात आले असुन, तिच्या सोबत तिचे सोबत 2 महीने लैगिंक अत्याचार करण्यात आला होता. त्यावरून एकुण 6 आरोपींना अटक करण्यात आले होते.  तब्बु उर्फ मनिषा तायडे, योगेश बांगर,  वैशाली वानखडे, उषा उर्फ रमाबाई मोरे, गोकुळा उर्फ कोकी मोरे,  विनोद दयालशंकर शर्मा. सदर 6 आरोपींविरूध्द तपासाअंती कलम 363, 366 (अ), 368, 370,370  (अ), 376 (2) (एन) 120 (ब), 344, 504, 506 भादवि सह कलम 4, 5, (एल), 6 पोक्सो ॲक्ट प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. 




सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाने एकुण 10 साक्षीदार तपासले असता आरोपींच्या वकीलांनी उलट तपासामधे आणलेल्या तफावत व सादर केलेल्या तथ्यांच्या विचार करून सरकार पक्ष सदर गुन्हा आरोपी विरूद्ध सबळ पुराव्यानिशी सिध्द करू शकले नाही त्यामुळे आरोपी क्र. 1 ते 6 यांना  एस.पी. गांगरकर, अति  सत्र न्यायाधीश, अकोला यांनी निर्दोष मुक्त केले. 



सदर प्रकरणात आरोपी क्र 1 करीता ॲड. अली रजा खान व आरोपी क्र. 2 करीता ॲड. अय्युब नवरंगाबादे, अन्य आरोपिंकरिता ॲड. रामटेके, ॲड. सैयद उमेर व ॲड. दिनेश खुराणीया यांनी बाजु मांडली.

टिप्पण्या