court news: लग्नाचे आमिष देवून शोषण करण्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपी तर्फे ॲड देवानंद गवई व ॲड शितल गवई 






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपीने पिडीतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केले, अश्या आरोपातून आणि पोकसो गुन्ह्यातून भीमनगर येथील रहिवासी असलेल्या युवकाची न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. शितल गवई आणि ॲड. देवानंद गवई यांनी सक्षमपणे मांडली. 


प्रमुख अकोला जिल्हा व सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयाने आरोपी विवेक नाजुकराव सिरसाट (रा. भिम नगर अकोला) याची भा.दं.वी. 376 (2) (एन), 417, 504, 506 सहकलम 3, 4, 5 (1), 6 पॉक्सो या गुन्हयातुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. 




आरोपी विवेक शिरसाट यांच्यावर आरोप होता की, सन 2018 मध्ये त्याची या प्रकरणातील पिडीता हिच्यासोबत फेसबुक या सोशल मिडीयावर ओळख झाली होती व ते दोघेही एकमेकांसोबत फेसबुकवर बोलत होते आणि त्यानंतर बोलता बोलता त्यांच्या मध्ये मैत्री निर्माण झाली व मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. आरोपी विवेक शिरसाट याने पिडीतेला लग्न करण्याचे आमिष देवुन, पिडीता राहत असलेल्या भाडयाच्या खोलीत व इतर ठिकाणी नेवुन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले व ती त्या शारिरीक संबंधापासून गर्भवती राहिली असता, तिला आरोपी विवेक शिरसाट याने अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या देवुन तिचा गर्भपात केला व नंतर तिला लग्न करण्यास नकार देवुन सोडून दिले. फिर्यादी पिडीतेने सदर घटनेचा पो.स्टे. जुने शहर, अकोला येथे 18.09.2019 रोजी रिपोर्ट दिला होता. 




पीडितेच्या रिपोर्ट वरून आरोपी विवेक शिरसाट यांच्या विरुध्द अपराध क्रमांक 850/2021 नुसार भा.दं.वी. च्या कलम 376 (2) (एन), 417, 504, 506 सहकलम 3, 4, 5 (1), 6 पॉकसो गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला सुवर्णा केवले यांनी पिडीता फिर्यादी तपास अधिकारी व इतर साक्षीदाराचे जाब जवाब नोंदविले. आरोपीचे वकील ॲड. शितल देवानंद गवई तायडे, ॲड. देवानंद गवई यांनी घेतलेला उलट तपास व केलेल्या युक्तीवादा द्वारे आरोपीला कशाप्रकारे पिडीतेने कशा प्रकारे अटकविले व त्यांच्यामध्ये तत्कालीन वेळेस प्रस्थापित झालेले शारिरीक संबंध हे दोघांच्या संमतीने झाले होते व त्यास फिर्यादीची पुर्ण संमती होती हे न्यायालया पटवुन दिले. 




आरोपीचे वकील ॲड. शितल देवानंद गवई तायडे व ॲड. देवानंद गवई यांचा युक्तीवाद ग्राहय धरून विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अकोला यांनी आरोपी विवेक शिरसाट विरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्यामुळे त्याची सदरहू गुन्हयातुन मुक्तता केली.

टिप्पण्या