court news: जादुटोणा करून अत्याचार केल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता



आरोपी तर्फे वकिल ॲड. अलीरजा खान व ॲड. अय्युब नवरंगाबादे 





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

भारतीय अलंकार 24

अकोला: जादुटोणा करून शारीरिक अत्याचार केल्याच्या आरोपातून दोन आरोपींची मंगळवारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.






हकीकत अशा प्रकारे आहे की, पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोलाच्या हद्दी मध्ये राहणाऱ्या महिलेने दि. 02/04/2018 रोजी पोलीस स्टेशन पातुर येथे रिपोर्ट दिला की, तिला पोट दुखत असल्याचा इलाज एक बाबा करतात, म्हणुन ती सदर बाबाकडे इलाजाकरिता गेली, तेव्हा तिच्या अंगावरून निंबु व औषध उतरवून दिले व फरक पडला नाही तर  परत या, असे सांगुन आरोपींनी त्यांचा मोबाईल नंबर दिला, फिर्यादीला पोटदुखी बरी झाली नसल्यामुळे फिर्यादीला लोणारला बोलविले व करणी केल्याचे सांगितले व त्याकरिता रू. 25000 /- खर्च येईल, म्हणुन फिर्यादीने रू. 5000/- आरोपींना दिले, त्यानंतर फिर्यादीला पातुर येथे गाडीने आणल्यानंतर सायंकाळी 7.00 वाजताचे दरम्यान फिर्यादीला औषध पिण्यास दिले व अंगावरून निंबु उतरवुन पुन्हा दि. 23/03/2018 रोजी पातुरला बोलावून तिला औषध पिण्यास दिले व फिर्यादीला गुंगी आली असता तिन्ही आरोपींनी फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केले व फिर्यादीचे अर्धनग्न फोटो काढुन फिर्यादीला व्हाटसअपव्दारे पाठविले व सदर फोटो इतरांना पाठविण्याची धमकी देवून रू. 10,000/- मागीतले व कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली, अशा आशयाच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पातुर यांनी अपराध क. 123 / 2018 कलम 376 (2) (ज) (न), 376 (ड), 328, 386, 34, 506 भा.दं.वि. व सह कलम 2 (ख), 3 (2) जादुटोणा विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करून तपासा अंती दोषारोपपत्र दाखल केले. 






सदर प्रकरण अकोला येथील वि. अतिरिक्त सह सत्र न्यायाधिश एस.पी. गोगरकर  यांचे न्यायालयात चालविण्यात आले असुन एक आरोपी नामे अख्तर खान रहेमान खान पठान हा प्रकरण चालु असतांनाच मरण पावला असल्याने त्याचे विरूध्द प्रकरण खारीज करण्यात आले होते.  इतर दोन आरोपी यांचे विरूध्द पुरावे घेतल्यानंतर आरोपीं विरूध्द सबळ पुरावा मिळून आला नसल्याने आरोपी नामे कलंदर खान शाहनुर खान, रोशन खान जब्बार खान पठान, यांना आज दि. 14/03/2023 रोजी निर्दोष मुक्त केले. आरोपीं तर्फे ॲड.  अय्युब नवरंगाबादे व ॲड. अलीरजा खान यांनी बाजु मांडली तर ॲड. अब्दुल शफीक यांनी त्यांना सहकार्य केले.

टिप्पण्या