bacchu kadu sentence 2 year: आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

   file photo 






नाशिक: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे. दरम्यान 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.



आंदोलन दरम्यान नाशिक महापालिका आयुक्तांवर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता.  या प्रकरणात बच्चू कडू यांना न्यायलयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 2017 साली आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. 




प्रहारच्या माध्यमातून नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, याबाबत आंदोलन सुरु होते. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाकडून तत्कालीन आयुक्तांची भेट घेण्यात आली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात वाद झाला होता. यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला होता. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. 




नाशिक महापालिकेनं 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. आमदार बच्चू कडू हे राज्यातील दिव्यांग बांधवासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.  


टिप्पण्या