- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्री सुनिल पाटील यांनी अप.क्र. 73 / 2023 कलम 7 भष्ट्राचार अधिनियम 1988 मधील आरोपी वैभव फुलचंद जोहरे वय वर्ष 29 तहसिल कार्यालय तेल्हारा येथील महसूल सहाय्यक याची दि. 18/03/2023 पर्यंत अँटी करप्शन ब्युरो अकोलाचे पोलीस कस्टडीमध्ये रवानगी केली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे की, अँटी करप्शन ब्युरो अकोला चे पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार यांनी या प्रकरणात शेगांव नाका तेल्हारा जि. अकोला येथे तेल्हारा तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक आरोपी वैभव जोहरे यास दि. 17/03/2023 चे रात्री अटक केली व विद्यमान कोर्टासमोर आरोपीला हजर केले.
या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा महसुल कार्यालय तेल्हारा येथे लोकसेवक आहे. या प्रकरणातील तेल्हारा येथील फिर्यादी याला रेतीची वाहतुक ट्रॅक्टरमधून करण्याकरीता 30,000/- रु. लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झालयाने या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असुन या प्रकरणात आरोपी वैभव जोहरे याचे नैसर्गीक आवाजाचे नमुने परिक्षण करण्याकरीता घेणे बाकी आहे. तसेच या प्रकरणात साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविणे बाकी आहेत तसेच या प्रकरणात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे किंवा कसे या बाबत सखोल तपास करणे बाकी आहे. त्यामुळे वरील प्रकरणात आरोपीला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश करण्यात यावा. अशी विनंती सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी केली तर आरोपी तर्फे ॲड. प्रदिप हातेकर यांनी युक्तीवाद केला व दोन्हीपक्षाचे युक्तीवादा नंतर कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
AkolaAdv Ajit Deshmukh
Anti Corruption Bureau
bribery case
clerk
police custody
tehsil office
Telhara
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा