akola crime: लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये युवती कडून युवकाचे अप्राकृतिक शोषण; युवती विरूद्ध पोलिसात तक्रार




 



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : लग्नाचे आमिष दाखवून मुलींची मुले फसवणूक करतात,असे प्रकार सामान्य झाले आहेत. मात्र अलीकडे मुलांची फसवणूक मुलीकडून होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. शेगाव येथील एका युवकासोबत असा प्रकार घडला असून,या युवकाने आता युवती विरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 




यासंदर्भात पीडित युवकाने शनिवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेवून त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा प्रसार माध्यम प्रतिनिधी समोर वाचला. 




शेगाव येथील रहिवासी मुलगा व मुलगी यांची 10 डिसेंबर 2017 रोजी खामगाव येथे एका लग्न समारंभ मध्ये भेट झाली. मुलीने मुलासमोर स्वतःहून प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर तीन दिवसानंतर युवकाने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला आणि तेंव्हापासून तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला.  हा प्रेमाचा खेळ 17 एप्रिल 2022 पर्यंत चालला. त्यानंतर मात्र मुलीच्या वागणुकीत बदल झाला.  प्रेमाचा शेवट करतांना मुलीने तिच्या आई वडील यांच्या सोबत संगनमत करून युवकावर गुन्हा दाखल केला, त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याविरुद्ध आता पीडित युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून न्यायासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, अशी आपबिती दस्तुरखुद्द या प्रकरणात अडकलेल्या राहुल खंडेराव याने पत्रकार परिषदेत सांगितली. 




युवती आणि पीडित युवकाची सतत भेटी गाठी सुरू झाल्यानंतर युवतीला नौकरी साठी आवश्यक परीक्षेसाठी बाहेरगावी सोबत जाणे येणे,पर्यटन करणे, मुलीला खुश करण्यासाठी तिने मांडलेल्या सर्व मागण्या युवकाने पूर्ण केल्या. महागडी गाडी युवकाने युवतीस भेट दिली. परीक्षेसाठी लागणारा खर्च आदी केला. दरम्यान दोघा मध्ये लग्नासाठी आणा भाका झाल्या. यानंतर दोघेही पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले. या दरम्यान दोघां मध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. अनेकवेळा युवकाचे युवतीने अनैसर्गिक पद्धतीने शारीरिक शोषण केले. यानंतर मुलीला बड्या पगाराची बँकेत नोकरी लागली आणि तिने राहुलचे प्रेम बाजूला करत त्याला झिडकारले. युवकाने युवती समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर जात आडवी करून लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. उलट पक्षी युवती आणि तिच्या घरच्यांनी युवका विरूद्ध गुन्हे दाखल केले. युवकांची फसवणूक करून त्याचा विश्वासघात करण्यात आला. तसेच शारीरिक, मानसिक प्रताडना  करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर पीडित युवकाने पुणे येथील वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे विश्वाघातकी मुली विरोधात तक्रार दाखल केली, असे  पीडित युवक राहुल खंडेराव याने अकोल्यात पत्रकार परिषदेत सांगितले.





इंडीयन पिनल कोड कलम 156( 3) नुसार वकील पप्पू मोरवाल यांच्या मार्फत पुणे न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट केले, असल्याची माहिती पीडित राहूल खंडेराव याने दिली. पत्रकार परिषदेत पीडित राहुल खंडेराव यांच्या सोबत ॲड. पप्पू मोरवाल उपस्थित होते.

टिप्पण्या