akola-crime-court-news-pocso: अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या युवकास 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; सह आरोपीस सहा महिन्याची साधी कैद


 


ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या आरोपी युवकास न्यायलयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणात त्याला साथ देणाऱ्या सह आरोपीस सहा महिन्याची साधी कैदची शिक्षा ठोठावली आहे. 




असा आहे निकाल 

बुधवार 15 मार्च रोजी पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश  शायना पाटील यांच्या न्यायालयात आरोपी  प्रकाश सुरेश इंगळे वय 26 वर्षे यास अल्पवयीन पीडितेच्या लैंगिक शोषण केल्या प्रकरणी भा द वी कलम 376 (2) व पोक्सो कलम 3-4 मध्ये दोषी ठरवण्यात आले व 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रू 10000/- दंड, दंड न भरल्यास 2 महिन्याची साधी कैद ठोठावण्यात आली. भा द वी कलम 363 अपहरण करणे या गुन्ह्यात 5 वर्षे सश्रम कारावास व रू 5000/- दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सर्वशिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. तसेच सह आरोपी आकाश विलास भटकर (वय 24 वर्षे) यांनी मुख्य आरोपीस गुन्हा करण्यास (पिडितेस पळऊन नेण्यास) सहकार्य केल्या बद्दल त्याला सुद्धा भा द वी कलम 363, 109 मध्ये 6 महिन्याची साधी कैद रू 2000 दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. 



अशी घडली घटना 

हकीकत अशी आहे की, पीडितेच्या वडिलांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी पो. स्टे. बोरगांव मंजू येथे फिर्याद दिली की, त्यांची मुलगी आदल्या दिवशी सकाळ पासून त्यांच्या घरी नाही. सर्वत्र शोध घेतला तरी कोठे सापडत नाही. आरोपी प्रकाश याने काही दिवसापूर्वी तिला पळवून  नेण्याची धमकी दिली होती, अशी माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात  20 सप्टेंबर 2016 रोजी म्हणजे 7 महिन्या नंतर आरोपी व पिडीता आरोपीच्या नातेवाईकांकडे निंमकर्दा येथे मिळून आले. आरोपीस अटक करून प्रकरणाचा तपास केला तेव्हा असे निष्पन्न झाले की, आरोपी प्रकाश याने आरोपी अशोकच्या मदतीने पिडितेस (वय 16 वर्षे) पळवून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी धरणी, हिवरखेड, निमकर्दा येथे तिला ठेवले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे पीडिता गरोदर होती व नंतर तिने अपत्यास जन्म दिला. 




7 साक्षीदारांच्या साक्षी


प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय युवराज उईके यांनी केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली. सरकार पक्षा तर्फे 7 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. कोर्ट पैरवी म्हणून एएसआय काझी व एएसआय  सतीश हाडोळे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या