akola-court-news-city-crime: मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास सक्तमजुरीची शिक्षा






ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी सचिन शालिकराम वाघमारे याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा आरोपीस भोगावी लागणार आहे.



असा दिला निकाल 

दिनांक २८.०२.२०२३ रोजी वि. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, अकोला श्रीमती शयना पाटील यांनी विशेष सत्र खटला क्रमांक ७१ / २०१७ या प्रकरणात आरोपी सचिन शालीकराम वाघमारे, वय २२ वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. सिध्दार्थ वाडी, वाशिम बायपास, जुने शहर, अकोला, ता.जि. अकोला, यास अल्पवयीन पिडीत हिचा विनयभंग केल्या प्रकरणी भा. द.वि कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष सक्त मजुरी व रु. ३,०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद, ३५४-ड सह कलम १२ पोक्सो ॲक्ट अंतर्गत १ वर्ष सक्त मजुरी व रु.३,०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद व ५०६ अंतर्गत दोषी ठरवून आरोपीस ६ महिने सक्त मजुरी व रु. १,०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद. सर्व शिक्षा आरोपीला सोबतच भोगावयाच्या आहेत. तसेच दंडाच्या रकमेतून पिडीतेला नुकसानभरपाई म्हणून द्यावी अशी शिक्षा दिली.




थोडक्यात हकीकत अशी 


पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला येथे दिनांक ३१.०१.२०१७ रोजी आरोपी विरुध्द पिडीतेने रिपोर्ट दिला की, आरोपी हा पिडीतेचा पाठलाग, हातवारे करत होता व सतत त्रास देत होता. घटनेच्या दिवशी त्याने पिडीतेचा हात पकडुन माझे सोबत बोलत जा आणि तुझा मोबाईल नंबर दे नाहीतर तुझे आयुष्य बर्बाद करुन टाकील अशी धमकी देवुन अश्लील शिवीगाळ केली. तिच्या अल्पवयिन मुलीचा विनयभंग करुन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशा रिपोर्ट वरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला. त्यावरुन तत्कालिन तपास अधिकारी, पो.उप. नि. स्वाती मधुकर इथापे, यांनी तपास करुन आरोपी विरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट केले.



१९ साक्षीदाराच्या साक्षी

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण १९ साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षी पुरावे ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली. अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजु वि.न्यायालयात मांडली. तसेच पैरवी अधिकारी ए. एस. आय. काझी, म.पो.हे. वैशाली कुंबलवार यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या