aerial show drone marathon : श्री शिवाजी अभियांत्रिकी मध्ये ऐरिअल शो तसेच ड्रोण मॅरेथॉन



 


भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग तर्फे "टेकनॉब्लिट्झ 2k23" च आयोजन करण्यात आलं. या टेक्निकल इव्हेंट मध्ये ड्रोन उडविण्याची आगळी वेगळी स्पर्धा अर्थात "द्रौन मॅरेथॉन "(DRONE MARATHON) चे आयोजन करण्यात आले.या निम्मित अकोल्यातील तसेच आस पासच्या विभागातील एकूण 15 ड्रोन-एक्सपर्टस यात सहभागी झाले होते.या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना प्रोत्साहन देणे हे या मागचं उद्देश होत. या स्पर्धेत दोन फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या.अनेक अडथळे कमी वेळात पार पाडून ही स्पर्धा स्पर्धकांनी रोचक केली. 1st prize 5000 , 2nd price 3000, 3 rd price 2000 देण्यात आले.






श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग सतत काही नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्याचा प्रयत्नांत असते.विविध प्रकारच्या रोबोट्स कार्यशाळा तसेच इतर तांत्रिकी  कार्यक्रम या विभागाद्वारे या पूर्वी आयोजीत  करण्यात आले आहेत. तसेच 2020 रोजी महाकाय हुमोनॉइड रोबोटचे प्रदर्शन करीत अकोलेकरांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरले. ह्याच नाविन्यपूर्ण कल्पनेचा वारसा पुढे नेत या वर्षी  या विभागाने  14 मार्च रोजी "टेकनॉब्लिट्झ 2k23" ह्या टेक्निकल इव्हेंट  मध्ये द्रौन  ची एक आगळी वेगळी स्पर्धा अर्थात "द्रौन मॅरेथॉन "(DRONE MARATHON)  आयोजित केली होती.






या निम्मित अकोल्यातील तसेच आस पास च्या विभागातील द्रौन-एक्सपर्टस करीता स्पर्धा ठेऊन एक आगळी वेगळी संधी उपलब्ध करून दिली .तसेच महाराष्टातील नामांकित द्रौन कंपन्या देखील यात आपले कंपन्यातील निर्मित विविध द्रौन या स्पर्ध्येचा निम्मित AERIAL SHOW  द्वारे  सादर केले. तसेच त्या निगडित विध्यार्थ्यांसाठी कार्यशाळा  आयोजित केली .







या शिवाय टेक्नोब्लिट्झ मध्ये गूगलर, मुवि मेनिया ,लॅन गेमिंग,आय पी यल औक्षण(IPL AUCTION),प्रोजेक्ट कॉम्पिटिशन  ,शालेय विद्यार्थ्यानंकरीता  क्विझ कॉम्पिटिशन असे विविध इव्हेंट देखील आयोजित केले.विभाग प्रमुख डॉ. एस. यल .सातारकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. के .देशमुख यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा पार पडली.





टिप्पण्या